शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

जिल्ह्यातील २७ प्रकल्प कोरडेठाक !

By admin | Updated: August 4, 2014 00:53 IST

लातूर : राज्यात एकिकडे धो-धो पाऊस बरसून पूरसदृश स्थिती निर्माण झालेली असताना लातूरकडे मात्र पावसाची अजूनही पाठ आहे़ दोन महिने उलटले तरी जिल्ह्यातील एकही मोठा, मध्यम व लघुप्रकल्प भरला नाही़

लातूर : राज्यात एकिकडे धो-धो पाऊस बरसून पूरसदृश स्थिती निर्माण झालेली असताना लातूरकडे मात्र पावसाची अजूनही पाठ आहे़ दोन महिने उलटले तरी जिल्ह्यातील एकही मोठा, मध्यम व लघुप्रकल्प भरला नाही़ सर्वच प्रकल्पांची क्षमता ६८६ दलघमी इतकी असताना आत्तापर्यंत केवळ ९७ दलघमीच पाणीसाठा झाला आहे़ तोही सिंचन अथवा पाणी पुरवठ्यासाठी पुरेसा उपयुक्त नाही़ शिवाय, २७ प्रकल्पांत तर थेंबभरही पाणी नाही़पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावलेली नाही़ किरकोळ पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असल्या तरी त्यानंतर मोठा पाऊस झाला नसल्याने आता पिके कोमेजू लागली आहेत़ याहून विदारक चित्र पाण्याच्या प्रकल्पात दिसून येते़ लातूर पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत मोठे, मध्यम व लघु असे एकूण १३९ प्रकल्प आहेत़ परंतु, गेल्या दोन महिन्यात त्यामध्ये पाण्याची पुरेसी भर पडली नाही़ मोठ्या क्षमतेच्या मांजरा प्रकल्पात आजघडीला केवळ २ दलघमी इतकेच पाणी उरले आहे़ तेरणा धरणात ११ टक्के पाणीसाठी असला तरी क्षमतेच्या तुलनेत ते शून्यातच म्हणावे लागेल अशी स्थिती आहे़जिल्ह्यातील तावरजा व व्हटी हे दोन मध्यम प्रकल्प अजूनही कोरडेठाक पडले आहेत़ रेणा मध्यम प्रकल्पात ७़७ दलघमी पाणी असून त्याची टक्केवारी ३२ टक्के इतकी आहे़ तिरु प्रकल्पात १४़७ (४३%), देवर्जनमध्ये ७़३ (३३%), घरणीत ५़६ (१३%), साकोळ प्रकल्पात २़८ (१०%) तर मसलगा मध्यम प्रकल्पात २़५ दलघमी (१०%) इतकाच पाणीसाठी आतापर्यंत झाला आहे़ लघु प्रकल्पांची अवस्थाही याहून वेगळी नाही़ जिल्ह्यात १२९ लघु प्रकल्प अस्तित्वात आहेत़ त्यापैकी २७ प्रकल्प कोरडेठाक असून ४६ प्रकल्पांमध्ये पाणी जोत्याखालीच आहे़ केवळ दोनच लघु प्रकल्पांत बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे़ त्यात उदगीर तालुक्यातील वागदरीत ६० तर जळकोट तालुक्यात माळहिप्परगा लघु प्रकल्पात ७० टक्के इतके पाणी साठले आहे़ (प्रतिनिधी)क्षमता ६८६, साठा ९७ दलघमी़़़ १३९ प्रकल्पांत ६८६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी साठविण्याची क्षमता आहे़ परंतु, आजघडीला यामध्ये केवळ ९७ दसलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा झाला आहे़ ज्याची टक्केवारी १४ इतकी आहे़ २ मोठ्या प्रकल्पांची उपयुक्त क्षमता २६८ असून त्यामध्ये उपयुक्त साठा झालाच नाही़ ८ मध्यम प्रकल्पांची उपयुक्त क्षमता १२२ दलघमी असून त्यामध्ये २५ दलघमी पाणी साठले आहे़ तर १२९ लघु प्रकल्पांची उपयुक्त क्षमता २९५ दशलक्ष घनमीटर असताना त्यात केवळ २६ दलघमी इतकाच पाणीसाठा झाला आहे़ या पाण्याचा पुरेसा उपयोग ना सिंचनासाठी होतोय ना पाणीपुरवठ्यासाठी़