शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन ‘गोंधळी’ सभेत २६ विषय मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:05 IST

-- औरंगाबाद : ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्या‌ऐवजी प्रत्यक्ष सभागृहात ऑफलाईन सभा घेण्याच्या सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून सोमवारी घेण्यात आलेल्या ...

--

औरंगाबाद : ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्या‌ऐवजी प्रत्यक्ष सभागृहात ऑफलाईन सभा घेण्याच्या सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून सोमवारी घेण्यात आलेल्या ऑनलाईन सभेत भाजप सदस्यांनी निषेध नोंदविला. महिनाभरात ऑफलाईन सभा घेण्याचे आश्वासन मिळाल्यावर सभा सुरू झाली. दहा ते पंधरा जण एकाच कक्षात समोरासमोर बसून भरलेल्या ऑनलाईन गोंधळी सभेत २६ विषय मंजूर करण्यात आले.

ग्रामीण भागात रुग्णसेवेसाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजातून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २२ रुग्णवाहिका खरेदीसह २६ हून अधिक विषयांना जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी मान्यता दिली.

सभेत उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, सभापती अविनाश गलांडे, किशोर बलांडे, मोनाली राठोड, अनुराधा चव्हाण यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. वैजापूर तालुक्यातील मनूर, गंगापूर तालुक्यातील काटे पिंपळगाव, नेवरगाव येथील जुने झालेले जलकुंभ, बाळापूर येथील प्राथमिक शाळेची इमारत तसेच इतर जीर्ण झालेल्या इमारती पाडण्याचा ठराव घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज करण्याकरिता आरोग्याच्या ३१ कोटींच्या पाच प्रस्तावांनाही मान्यता दिली गेली.

सभेमध्ये केशव तायडे, मधुकर वालतुरे, रमेश गायकवाड, जितेंद्र जैस्वाल, प्रकाश चांगुलपाये, छाया अग्रवाल, पुष्पा काळे, रमेश पवार, आदींनी मतदार संघातील प्रश्न उपस्थित केले. सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने सभागृहात घेण्याविषयीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ जि. प. सदस्य मधुकर वालतुरे, किशोर पवार, प्रकाश चांगुलपाये यांनी काळे मास्क लावून निषेध नोंदविला.