बाळासाहेब जाधव , लातूरजिल्ह्यात रस्ते अपघातात गेल्या वर्षभरात २५० जणांचा मृत्यू झाला आहे़ वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांचा विकास होत नाही़ शिवाय, रस्तेही खराब झाले आहेत़ खराब अन् अपुऱ्या रस्त्याचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे़ अनेकदा मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांमुळे अपघात झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़ लातूर शहरासह जिल्हाभरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ परंतु या वाहनधारकांना प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या रस्त्याची मात्र दुरावस्था झाली आहे़ शहरासह कुठल्याही तालुक्यात प्रवास केला तरी रस्त्याची दूरवस्था मात्र पहावयास मिळणार आहे़ खराब रस्ते अन् मद्यपी चालकांच्या चुकीमुळे वर्षभरात ५९ अपघात झाले आहेत़ पोलिस दप्तरी केवळ मोठ्या अपघातांची नोंद असून किरकोळ अपघात तर दररोजच होतात़ मोठ्या अपघातात जानेवारी ते डिसेंबर महिन्यात २५१ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे़ फेब्रुवारी मध्ये ६८ अपघात, मार्च-७६, एप्रिल-६४, मे-७२, जून-६७, जुलै-५५, आॅगस्ट-४१, सप्टेंबर- ३९, आॅक्टोबर-४९, नोव्हेंबर-४६, डिसेंबर अखेरपर्यंत ६४२ अपघात झाले आहेत़ या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसताना अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत २३६ प्रासंगिक अपघात झाले़ तर गंभीर अपघात २३० झाले़ तर किरकोळ अपघातांची संख्या १३० वर गेली आहे़ एकूण अपघातामध्ये गंभीर जखमींचा आकडा ७२१ वर गेला आहे़ तर मृतांची संख्या २५१ झाली आहे़ लातूर ते नांदेड मार्गावरील लातूर जिल्हा हद्दीपर्यंतचा रस्ता खड्डेमय आहे़ शिवाय लातूर ते औसा या मार्गावरील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने या मार्गावर दैनंदिन अपघात होतात़ शिवाय , चाकूर तालुक्यातील चापोलीनजीक रस्त्याची दुरावस्था झाल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहे़ त्यामुळे अपघाताच्या निमित्ताने रस्ते दुरूस्तीची मागणी होत आहे़ ४वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्या प्रमाणात अपुरे रस्ते, आहे त्या रस्त्यांचीही दुरावस्था झालेली आहे़ त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ वर्षभरामध्ये सर्वाधिक अपघात मे महिन्यात झाले़ तर जून महिन्यात सर्वाधिक ३२ जणांचा मृत्यू अपघातामुळे झाल्याची प्रशासन दप्तरी नोंद आहे़ ४लातूर जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत़ अनेक रस्त्यांवर मोठमोठी खड्डे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरूस्ती होत नाही़ वाहनधारकांची ओरड वाढल्यावर तात्पुरती डागडुजी केली जाते़ औसा ते लातूर चौपदरी रस्ता अनेक दिवसांपासून रखडला आहे़ कामासाठी रस्ता खोदण्यात आला, मात्र तो बुजविण्यात आला नसल्याने या मार्गावर अपघात वाढले आहेत़
वर्षभरात रस्ते अपघातांत २५१ जणांचा मृत्यू
By admin | Updated: December 28, 2014 01:15 IST