जालना : जिल्ह्यात सर्वाधिक नूतन मतदार नोंदणी जालना विधानसभा मतदार संघात झाली आहे. ७ हजार २२९ नूतन मतदारांची भर पडली आहे. या विधानसभेत एकाही तृतीय पंथीच्या नावाचा समावेश नाही. सर्वात कमी नूतन मतदार नोंदणी बदनापूर विधानसभेसाठी झाली आहे. जिल्ह्यातील पाचही विधानसभांमध्ये २५ हजार ३७० नूतन मतदारांची भर पडली आहे. गत विधानसभेच्या आकडेवारीनुसार केवळ २ तृतीय पंथी मतदारांनी नोंदणी केली होती. मात्र ३१ जुलै २०१४ पर्यंत ५ तृतीय पंथींनी नोंदणी केली. गत विधानसभेत मतदार संख्या पुढील प्रमाणे होती. कंसातील आकडे पुरूष मतदार दर्शवितात. परतूर २ लाख ५८ हजार ६९० (१ लाख ३६ हजार ९९२), घनसावंगी २ लाख ७५ हजार ५८ (१ लाख ४४ हजार २९), जालना २ लाख ८२ हजार ९७८ (१ लाख ५२ हजार ७), बदनापूर (राखीव) २ लाख ७० हजार ३३४ (१ लाख ४३ हजार ८१६), भोकरदन २ लाख ५९ हजार १६१ (१ लाख ३८ हजार ५४७) असे होते. जिल्ह्यात पाचही विधानसभांसाठी १३ लाख ४६ हजार २२१ मतदार होते. यात पुरूष मतदार ७ लाख १५ हजार ३९० तर महिला ६ लाख ३० हजार ८२९ होते. ३१ जुलै २०१४ पर्यंत विधानसभा निवणूकीसाठी अद्यावत करण्यात आलेल्या यादीत ५ तृतीय पंथी मतदारांनी नोंदणी केली. आॅक्टोबर २०१४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदार संख्या पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे पुरूष मतदार दर्शवितात. परतूर २ लाख ६३ हजार १२५ (१ लाख ३९ हजार ३२३), घनसावंगी २ लाख ७९ हजार ९१३ (१ लाख ४६ हजार ६२१), जालना २ लाख ९० हजार २०७ (१ लाख ५५ हजार ६४७), बदनापूर (राखीव) २ लाख ७४ हजार २२७ (१ लाख ४५ हजार ७५५), भोकरदन २ लाख ६४ हजार ११९ (१ लाख ४० हजार ९२३) असे आहेत. जिल्ह्यात पाचही विधानसभांसाठी १३ लाख ७१ हजार ५९१ मतदार आहेत. यात पुरूष मतदार ७ लाख २८ हजार २६९ तर महिला ६ लाख ४३ हजार ३१७ आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात २५ हजार ३७० नवीन मतदारांची नोंदणी
By admin | Updated: September 16, 2014 01:31 IST