शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

२५ % फटाके शिल्लक

By admin | Updated: October 31, 2016 00:45 IST

सुमारे २० ते २५ टक्के फटाके विक्रीविना शिल्लक राहिल्याचे दिसून आले.

औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केट शनिवारच्या आगीमध्ये भस्मसात झाले. परिणामी, अन्य ठिकाणच्या फटाका बाजारांत यंदाचेच नव्हे, तर मागील वर्षीचेही फटाके विकले जातील, असा होरा व्यक्त केला जात होता. मात्र, झाले उलटेच. रात्री लक्ष्मीपूजनानंतर फटाका बाजारांत बहुतांश दुकाने फटाक्यांनी सजलेलीच होती. सुमारे २० ते २५ टक्के फटाके विक्रीविना शिल्लक राहिल्याचे दिसून आले. औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर अग्नितांडव घडले. यात सुमारे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे केवळ व्यापारी वर्गच नव्हे, तर संपूर्ण शहरवासीयांना मोठा हादरा बसला.या आगीमध्ये १० कोटींचे फटाके नष्ट झाले. एकसुद्धा फटाका नावालाही शिल्लक राहिला नाही. शहरातील नागरिक फटाके खरेदीसाठी हडकोतील टीव्ही सेंटर मैदान किंवा सिडको एन-५ येथील राजीव गांधी क्रीडांगण येथे जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, या दोन्ही फटाका मार्केटमधील परिस्थिती वेगळीच होती. येथे दरवर्षीप्रमाणे फटाके खरेदीसाठी गर्दी झाली होती; पण विक्रीत १० ते १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली नाही. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत या फटाका मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी होती. त्यानंतर मात्र गर्दी ओसरली. आमच्या प्रतिनिधीने रात्री ९ वाजेदरम्यान या फटाका मार्केटमध्ये फेरफटका मारला तेव्हा बहुतांश दुकाने फटाक्यांनी सजलेलीच दिसून आली. फटाके विकले गेले; पण ७५ टक्केच. कारण, शहरातील ग्राहक अपेक्षेनुसार फटाके खरेदीसाठी सिडको-हडकोत फिरकलेच नाहीत. हडकोतील भारतमाता फटाका असोसिएशनचे अध्यक्ष मनोज गायके यांनी सांगितले की, सर्व विक्रेत्यांचा मिळून २० ते २५ टक्के माल शिल्लक राहिला आहे. जुन्या शहरातील ग्राहक कमी प्रमाणात हडकोत फटाके खरेदीसाठी आले. हे ग्राहक आले नसते, तर ३० ते ३५ टक्के माल शिल्लक राहिला असता. आता शिल्लक फटाके कुठे ठेवायचे, असा यक्ष प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. कारण, फटाक्यांची विक्री लक्ष्मीपूजनाला जास्त होत असते. आता शिल्लक माल येत्या लग्नसराईत विक्री करावा लागेल.