विलास चव्हाण, परभणीयेथील जिल्हा रुग्णालयातील जळीत विभागात मार्च २०१३-१४ मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांपैकी २४ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला़ तर ७६ टक्के रुग्णांचा प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले़आई, वडिलांनी मुलांना अथवा पतीने पत्नीला रागावल्याने रागाच्या भरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेणे तसेच पेटता देवा अंगावर पडणे तसेच स्टोव्हच्या भडक्यामुळे मार्च २०१३-१४ या वर्षभरात परभणी जिल्हा रुग्णालयात ३८१ जळीत रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते़ त्यापैकी उपचारादरम्यान ९४ रुग्णांचा मृत्यू झाला तर २८६ रुग्णांवर उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यास डॉक्टरांना यश आले़ वर्षभरामध्ये ३८१ रुग्ण या ना त्या कारणाने भाजले होते़ रुग्णालयात हा एवढा मोठा आकडा पहायला तर मोठा आहेच शिवाय खाजगी रुग्णालयामध्ये भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत़ वर्षभरात हजाराच्या जवळपास हा आकडा असेल़ घरातील क्षुल्लक कारणामुळे अनेक जण स्वत:ला पेटवून घेण्याच्या घटना वाढत आहेत़ यासाठी शासनस्तरावरून जनजागृती करणे गरजेचे आहे़ मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे अनमोल जीव क्षुल्लक कारणामुळे गमवावे लागत आहेत़ याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ पैसे घेऊन केली जाते मलमपट्टी येथील जिल्हा रुग्णालयातील जळीत विभागातील परिचारिकांनी जळीत रुग्णांची मलमपट्टी करणे गरजेचे असते़ परंतु, येथे शिपाईच मलमपट्टी करण्यासाठी २०० ते ३०० रुपये रुग्णांकडून घेतात़ यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे़ पैसे नाही दिले तर मलमपट्टी तुम्हीच करा असे उद्धटपणे बोलले जाते़ रुग्णांचे नातेवाईक नाईलाजास्तव पैसे देतात़ याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे़ जळीत वार्डामध्ये तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिकांचा अभाव आहे़ अशा प्रतिकूल परिस्थितीतही रुग्णांवर उपचार केले जातात़ अनेकांचे जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे़ तसेच खाजगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना रुग्णांच्या उपचारासाठी बोलावले असता, हे डॉक्टर उपचारासाठी येत नाहीत़ त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे़, असे डॉ़ प्रकाश डाके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़ येथील जिल्हा रुग्णालयात जळीत विभागात खाटांची संख्या २० आहे़ हा वार्ड वातानुकूलित आहे़ येथील जळीत वार्डात अनेक महिन्यांपासून तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे़ त्यामुळे जळीत रुग्णांना योग्य प्रकारे उपचार करणे अवघड झाले आहे़ त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त होत आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करणे गरजेचे आहे़ तालुका व ग्रामीण भागातील रुग्णालयात जळीत रुग्णांसाठी सुविधांचा अभाव आहे़ त्यामुळे काही रुग्ण उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू पावतात़ तज्ज्ञ डॉक्टर व सुविधा आवश्यक आहेत़ मार्च२४एप्रिल२३मे २१जून१७जुलै२५आॅगस्ट२०सप्टें१४आॅक्टो१७नोव्हें२९डिसेंबर२३जाने़ २५फेब्रु़२१मार्च२७