शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२४ कोटींचे निधी वितरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:39 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होवून ३ महिन्यांचा कालावधी लोटला तरी या निधीचे तालुकानिहाय वितरण अद्याप झालेले नाही़ सदस्यांमधील अधिक निधी मागणीच्या राजकारणातून हे वितरण रखडल्याने विकास कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होवून ३ महिन्यांचा कालावधी लोटला तरी या निधीचे तालुकानिहाय वितरण अद्याप झालेले नाही़ सदस्यांमधील अधिक निधी मागणीच्या राजकारणातून हे वितरण रखडल्याने विकास कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे़राज्य शासनाच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दलित वस्त्यांचा विकास करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो़ यावर्षी परभणी जिल्हा परिषदेसाठी या अंतर्गत २४ कोटी रुपयांचा निधी ३ महिन्यांपूर्वी उपलब्ध झाला़ जि़प़च्या विषय समित्या गठीत झाल्या नसल्याने या निधीचे वितरण गेल्या महिन्यापर्यंत करता येत नव्हते़ परंतु, आॅगस्टच्या प्रारंभी विषय समित्यांच्या निवडी झाल्या़ त्यानंतर समितीची बैठक घेऊन तातडीने निधी खर्चाचे नियोजन करणे आवश्यक होते़ याकरीता संबंधित गावांची निवड करून याबाबतचे विकास आराखडे तयार करणे व त्या विकास आराखड्यात मान्यता देवून निधीची मागणी करणे गरजेचे असताना जिल्हा परिषद सदस्यांमधील अंतर्गत वादातून ही सर्व प्रक्रिया प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे़ जि़प़च्या समाजकल्याण समितीची ११ सप्टेंबर रोजी बैठक झाली़या बैठकीत या निधी वितरणाबाबत चर्चाही झाली़ परंतु, निर्णय मात्र झाला नाही़ परिणामी हा निधी सध्या पडून आहे़ निधी पडून राहण्यामागे सदस्यांमध्ये निधी मिळविण्यावरून निर्माण झालेली स्पर्धा कारण असल्याचे समजते़ समाजकल्याण समितीवरच्या सदस्यांना अधिक निधी हवा आहे तर अन्य काही पदाधिकारी व सदस्यांनी अधिक निधीची मागणी केली आहे़ गेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या वेळी काही भागांमध्ये त्या भागातील समाजकल्याण सभापती असताना अधिक निधी गेला होता़ त्या भागात आता कमी निधी द्यावा, अशी काही सदस्यांची भूमिका आहे़ परंतु, त्या भागातील समितीचे पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत़ यामुळे या निधीचे वितरण होवू शकलेले नाही़निधी वितरणाच्या अनुषंगाने काही जि़प़ सदस्य, पदाधिकारी व महिला पदाधिकाºयांच्या पतींच्या बैठकींमध्ये अनौपचारिकरित्या निधी वाटपाबाबत निर्णय झाला़ परंतु, त्या निर्णयाला मूर्त स्वरुप येऊ शकले नाही़ त्यामुळे पुन्हा एकदा हा निधी प्रलंबित राहिला आहे़ परिणामी या निधीतून करण्यात येणाºया विकास कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे़