शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

२३०० शेततळी वर्कआॅर्डरच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 26, 2016 00:46 IST

बाळासाहेब जाधव , लातूर शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा तालुक्यांतून ४१४९ जणांनी आॅनलाईन अर्ज केले.

बाळासाहेब जाधव , लातूरशासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा तालुक्यांतून ४१४९ जणांनी आॅनलाईन अर्ज केले. त्यापैकी ३२७५ शेतकऱ्यांचे अर्ज या योजनेसाठी पात्र ठरले. परंतु, यातील फक्त २३०० शेततळी परिपूर्ण प्रक्रिया करून शेततळ्यांच्या वर्कआॅर्डरच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी २० बाय २२ साईजचे शेततळे घेण्यासाठी त्या-त्या तालुक्यांतील कृषी कार्यालयाकडे शेततळ्यांसाठी अर्ज केले. लातूर तालुक्यातून ७६३, औसा ८६५, निलंगा ६३६, शिरूर अनंतपाळ २०४, रेणापूर ७००, उदगीर १९०, देवणी १९१, जळकोट ७५, अहमदपूर ८५८, चाकूर २१६ अशा एकूण ४१४९ शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी कृषी कार्यालयाकडे आॅनलाईन अर्ज केले. त्यापैकी ४०५३ जणांनी सेवाशुल्क भरले. तर परिपूर्ण प्रक्रिया होऊन ३२७५ अर्ज ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. १७६३ जणांना वर्कआॅर्डर दिल्या आहेत. तर २१९ शेतकऱ्यांची शेततळी पूर्ण झाली असून, त्याला यापोटी मिळणारे अनुदानही अदा करण्यात आले आहे. परंतु, एकूण शेततळ्यांपैकी २३०० शेततळी मात्र अद्यापही वर्कआॅर्डरच्या प्रतीक्षेत आहेत.‘मागेल त्याला शेततळी’ या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना शेततळी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ४१४९ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. तर ३२७५ शेतकऱ्यांचे अर्ज लाभासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी फक्त २१९ लाभार्थ्यांना शेततळ्यांचा लाभ पहिल्या टप्प्यात मिळाला आहे. त्यामुळे लातूर तालुक्यात ६३, औसा २७, निलंगा १६, शिरूर अनंतपाळ २२, रेणापूर ६१, देवणी ३, जळकोट २, अहमदपूर १०, चाकूर १० तर उदगीर तालुका सर्वाधिक मोठा असतानाही फक्त दोन शेतकऱ्यांना शेतळ्यांचा लाभ मिळाला आहे.