शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

२२५ तलावांना गळती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 00:05 IST

उस्मानाबाद :जिल्हाभरातील सुमारे सव्वादोनशेवर तलाव गळके असल्याचा प्रकार समोर आला आहे.

उस्मानाबाद : तीन ते चार वर्षानंतर जिल्हाभरात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे पाझर तलाव, सिंचन तलाव, गावतलाव अन् प्रमुख मोठे प्रकल्पही शंभर टक्के भरले. त्यामुळे बळीराजासह ग्रामस्थ सुखावले आहेत. असे असतानाच जिल्हाभरातील सुमारे सव्वादोनशेवर तलाव गळके असल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील ३५ ते ४० वर्षांपासून या प्रकल्पासाठी शासनाने छदामही उपलब्ध करून दिलेला नसल्याने दुरुस्ती झालेली नाही. प्रकल्पांची पाणीगळती वेळीच न रोखल्यास संबंधित प्रकल्प पूर्णक्षमतेने भरूनही भविष्यात ग्रामस्थांना टंचाईला तोंड द्यावे लागेल !जिल्हाभरातील बहुतांश पाझर तलाव, सिंचन तलाव, गावतलाव १९७०-७२ च्या कालावधीत बांधण्यात आले आहेत. मजुरांची गरज लक्षात घेऊन ही कामे करण्यात आली होती. त्यामुळे बहुतांश प्रकल्पांच्या बाबतीत तांत्रिक घटक फारसे पाहिलेले नाहीत. दरम्यान, प्रकल्प उभारल्यानंतर किमान दर दहा वर्षांनी त्याची डागडुजी करणे अपेक्षित असते. यामध्ये प्रकल्पाच्या पायातून होणारी गळती थांबविणे, खचलेल्या सांडव्यांची दुरुस्ती करणे, चिबड चारी दुरुस्त करणे आदी कामे करणे अपेक्षित असते. परंतु, मागील ३५ ते ४० वर्षांच्या कालावधीत या तलावांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले गेले. दुरुस्तीसाठी छदामही मिळाला नाही. मागील तीन-चार वर्षांत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे हे प्रकल्प कोरडेठाक होते. हे प्रकल्प दुरुस्त करण्याची हीच योग्य वेळ होती. परंतु, तसे झाले नाही. दरम्यान, जिल्ह्यात यंदा परतीच्या पवासाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे वार्षिक सरासरीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे विशेषत: पाझर तलाव, सिंचन तलाव, गाव तलाव तुडूंब भरले. परंतु, सव्वादोनशेवर प्रकल्प गळके असल्याने पाणी वाया जात आहे. सदरील प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला असता, तर हे प्रकल्प आज सुस्थितीत राहिले असते. आणि पाणीही वाया गेले नसते, अशी प्रतिक्रीया संबंधित धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांतून उमटू लागली आहे.