शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विभागात २२.५ लाख पुस्तकांचा पुरवठा

By admin | Updated: May 25, 2014 01:10 IST

बाळासाहेब जाधव , लातूर सर्वशिक्षा अभियान मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत २२ लाख ६० हजार ४०४ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला.

बाळासाहेब जाधव , लातूर जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियान मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्र्थ्यांना लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी २२ लाख ६० हजार ४०४ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा २४ मे २०१४ पर्यंत करण्यात आला. शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियान विभागाअंतर्गत २०१४-१५ साठी मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू करण्यात आले. यामध्ये लातूर विभागीय कार्यालयाअंतर्गत येणार्‍या लातूर जिल्हा परिषदेकडून २१ लाख ४६ हजार २२९ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ११ लाख २५ हजार २४२ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा २४ मेपर्यंत करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी २२ लाख ३४ हजार ३३२ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ लाख १२ हजार ५९५ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. तर नांदेड जिल्ह्यासाठी २२ लाख २१ हजार ४२० पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली. त्यापैकी ६ लाख २२ हजार ५६७ पाठ्यपुस्तकांच्या प्रतींचा पुरवठा शनिवारअखेरपर्यंत करण्यात आला. लातूर जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियान विभागाअंतर्गत येणार्‍या इयत्ता पहिली ते आठवी या वर्गांतील ३ लाख ७२ हजार ६४० लाभार्थ्यांपैकी मराठी माध्यमाच्या ३ लाख ४५ हजार ४७४ व उर्दू माध्यमाच्या २६ हजार ८६६ लाभार्थी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लातूर विभागीय पाठ्यपुस्तक मंडळाच्या वतीने पुरवठ्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. यामध्ये लातूर तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये मराठी माध्यमाच्या १ लाख ५ हजार ७२० पाठ्यपुस्तकांचे व उर्दू माध्यमाच्या ९ हजार ९३६ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा संबंधित गटशिक्षणाधिकार्‍यांकडे करण्यात आला. रेणापूर तालुक्यासाठी मराठी माध्यमाच्या १६ हजार ८७२ व उर्दू माध्यमाच्या ७५३ विद्यार्थ्यांसाठी लागणार्‍या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा गटशिक्षणाधिकार्‍यांकडे करण्यात आला. औसा तालुक्यासाठी मराठी माध्यमासाठी ३७ हजार २०६ तर उर्दू माध्यमासाठी २ हजार ४६५, निलंगा तालुक्यातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ४२ हजार ४७६ तर उर्दू माध्यमाच्या २७८२, शिरूर अनंतपाळच्या १० हजार ५९९, देवणीच्या मराठी माध्यमाच्या १२ हजार २३१, उर्दू माध्यमाच्या ३६५, उदगीर तालुक्यातील मराठी माध्यमासाठी ४७ हजार २८५, उर्दूसाठी ६.८४, जळकोट तालुक्यातील मराठी माध्यमासाठी १२ हजार ७७४, उर्दूसाठी २८५, अहमदपूर तालुक्यातील मराठी माध्यमासाठी ३६ हजार ७४६, उर्दू माध्यमासाठी ३१५५, चाकूर तालुक्यासाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी २३ हजार ८६५ तर उर्दूसाठी १०४१ मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सर्वशिक्षा अभियानांतर्गत संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडे करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ विभागीय कार्यालय लातूर व सर्वशिक्षा अभियान यांच्या संयुक्त प्रयत्नाने २२ लाख ६० हजार ४०४ पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सध्यापर्यंत ६५ टक्के वाटप झाले असून, ३१ मेपर्यंत पूर्ण वाटप होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे लातूर भांडार व्यवस्थापक भाऊसाहेब पवार यांनी दिली.