बीड: आॅगस्ट २०१३ मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २२ शिक्षकांना दिलेल्या नियमबाह्य पदोन्नत्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. शिवाय वेतननिश्चितीही रद्द केली.एकूण ४८ शिक्षकांना तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांनी तात्पुरत्या स्वरुपात विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख या पदांवर पदोन्नत्या दिल्या होत्या. मात्र, या पदोन्नत्या आदेशाअधारे शिक्षकांनी वेतनश्रेणीही वाढवून घेतली. दरम्यान, पदोन्नती समितीची बैठक घेतली नाही. ज्येष्ठता डावलून पदोन्नत्या दिल्याची तक्रार झाली.त्यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वीच तत्कालीन सीईओ जवळेकर यांनी नियमबाह्य २२ पदोन्नत्या रद्दचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाचे पालन न करता काही शिक्षकांनी तात्पुरती पदोन्नती नियमित करण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. नियमबाह्य कामांविरुद्ध कास्ट्राईबने जि.प. समोर बेमुदत उपोषण सुरु केल्याने सीईओ ननावरे यांनी नियमबाह्य पदोन्नत्या रद्दचे आदेश काढले.त्यानुसार मंगळवारी शिक्षणाधिकारी (प्रा.) सुखदेव सानप यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेत २२ पदोन्नत्या रद्द केल्या.(प्रतिनिधी)
२२ शिक्षकांच्या पदोन्नत्या अखेर रद्द
By admin | Updated: February 11, 2015 00:28 IST