शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
3
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
4
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
5
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
6
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
7
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
8
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
9
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
10
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
11
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
12
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
13
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
14
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
15
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!
16
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
17
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
18
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
19
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
20
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे

शिवसेना समर्थक २२ नगरसेवक सहलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:18 IST

महापौर, उपमहापौर निवडणूक जवळ येऊ लागताच राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला असून, शिवसेनेने कोणताच धोका न पत्करता अपक्षांची मोट अत्यंत यशस्वीपणे बांधली असून, तब्बल २२ सेना समर्थक नगरसेवकांना शुक्रवारी थेट सहलीवर पाठवून देण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापौर, उपमहापौर निवडणूक जवळ येऊ लागताच राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला असून, शिवसेनेने कोणताच धोका न पत्करता अपक्षांची मोट अत्यंत यशस्वीपणे बांधली असून, तब्बल २२ सेना समर्थक नगरसेवकांना शुक्रवारी थेट सहलीवर पाठवून देण्यात आले. सेनेचे नगरसेवकही २५ आॅक्टोबरला सहलीवर रवाना होणार आहेत. सेनेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपमध्ये महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने कमालीची शांतता पसरली आहे. आपले नगरसेवक सहलीवर पाठवायचे किंवा नाही याबाबत भाजप मौन बाळगून आहे.महापौर, उपमहापौर निवडणूक २९ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार असून, २५ दिवस आधीच महापौरपदाचा उमेदवार जाहीर करून सेनेने या निवडणुकीत जोरदार आघाडी घेतली. ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी देऊन सेनेने अनेकांची कोंडी करून टाकली. भाजपमधील इच्छुकांच्या तोंडचे पाणीच पळाले. यानंतर भाजप स्वबळावर महापौर निवडणूक लढविणार अशी भाषा करण्यात येऊ लागली. हा सर्व प्रकार अत्यंत संयमाने घेत सेनेने कोणतेच राजकीय अस्त्र बाहेर काढले नाही. भाजपचा आकडा ३६ पेक्षा अधिक वर जातच नव्हता. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर निवडणूक स्वबळावर न लढता सेनेला पाठिंबा देण्याचा आदेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला बायपास करण्याची हिंमत अजून भाजपच्या कोणत्याच पदाधिकाºयांमध्ये नाही.