शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

२१९ कोटींच्या कर्जमाफीची शक्यता

By admin | Updated: June 13, 2017 00:01 IST

हिंगोली : त्यामुळे पीककर्ज घेतलेल्या ४५ हजा ३५८ शेतकऱ्यांना २१९ कोटींची तर कृषी दीर्घमुदती कर्ज घेणाऱ्या २0 हजार ६१४ शेतकऱ्यांना १२१ कोटींच्या कर्जमाफीची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्य शासनाने सरसकट कर्जमाफी देण्याच्या निर्णयाला तत्वत: मान्यता दिली असली तरीही अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पीककर्ज घेतलेल्या ४५ हजा ३५८ शेतकऱ्यांना २१९ कोटींची तर कृषी दीर्घमुदती कर्ज घेणाऱ्या २0 हजार ६१४ शेतकऱ्यांना १२१ कोटींच्या कर्जमाफीची शक्यता आहे. कर्जमाफीची घोषणा झाली असली तरीही त्याचे अधिकृत निकष अजून जाहीर झाले नाहीत. शेतकऱ्यांना साधारणपणे पीककर्ज व दीर्घमुदती कर्ज दिले जाते. हिंगोली जिल्ह्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या दोन्हींमध्ये दिलेल्या कर्जापैकी ३४0.८५ कोटींची थकबाकी मार्च २0१७ अखेर आहे. त्यामुळे शासन निर्णयात पीककर्ज व दीर्घमुदती अशा दोन्ही बाबींना स्थान दिले तर ३४0 कोटींची कर्जमाफी होणार आहे. मात्र पीककर्ज तेवढे घेतले तर २१९ कोटींची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे.यामध्येही व्यावसायिक बँकाचे १४५८९ अत्यल्प भूधारकांनी ६५.0३ कोटी, १८२३६ अल्प भूधारकांनी ११६ कोटींचे पीककर्ज थकविलेले आहे. या दोन्हींना माफीची शक्यता आहे. तर ३६४८ इतर शेतकऱ्यांनी ५१.७२ कोटींचे पीककर्ज थकविले आहे. यातील किती कर्ज निकषात बसते हे पहावे लागणार आहे. ग्रामीण बँकेचेही ३१४३ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे ९.५८ कोटींचे, अल्पभूधारक २८७७ जणांचे २०.३० कोटी तर इतर १२९२ शेतकऱ्यांचे १८.५७ कोटींचे पीककर्ज थकलेले आहे. मध्यवर्ती बँकेचे २५४१ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी २.५५ कोटी, ३९७२ अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ४.९३ कोटी तर इतर २२५३ शेतकऱ्यांनी ७.९३ कोटी थकविले आहेत. ही सर्व परिस्थिती पीककर्जाबाबतची आहे. दीर्घ मुदती कर्जामध्ये व्यावसायिक बँकांचे ७२९४ अत्यल्प भूधारकांकडे ४०.७० कोटी, १२१७८ अल्पभूधारकांकडे ७७.८४ कोटी तर ४८६४ इतर शेतकऱ्यांकडे ३७.१५ कोटी थकले आहेत. ग्रामीण बँकेनेही ९३३ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना १.६८ कोटी, २२४ अल्पभूधारक शेतकऱ्यांना १.५४ कोटी तर इतर १०० शेतकऱ्यांना १.७३ कोटी रुपयांचे दीर्घ मुदती कर्ज दिल्यानंतर ते थकले आहेत. मध्यवर्ती बँकेचे दीर्घ मुदती कर्ज कमी थकीत आहे. ५० हजारांपर्यंतचे कर्ज दिल्याची पुढीलप्रमाणे स्थिती आहे. यात व्यावसायिक बँकांनी २१८८३ जणांना १०५ कोटी, ग्रामीण बँकेने ४०७६ शेतकऱ्यांना ११ कोटी तर मध्यवर्ती बँकेने ८६४९ शेतकऱ्यांना १५.७७ कोटी रुपये वितरित केले होते. ५० हजार ते १ लाखांमध्ये व्यावसायिक बँकांत ३०३९४ शेतकऱ्यांकडे १९४.६० कोटी, ग्रामीण बँकेचे ३१०१ शेतकऱ्यांकडे २१.८४ कोटी, मध्यवर्ती बँकेचे १२० शेतकऱ्यांचे १.५२ कोटी थकले आहेत. १ लाख ते दीड लाखांच्या मर्यादेत ८५१२ शेतकऱ्यांकडे ८८.८७ कोटी, ग्रामीण बँकेचे १३९२ शेतकऱ्यांकडे २०.३० कोटी तर मध्यवर्ती बँकेचे ४ शेतकऱ्यांचे ६ लाख थकले आहेत.