शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

धरणांत २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

By admin | Updated: July 10, 2017 00:05 IST

परभणी : जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पिके अडचणीत सापडली आहेत़ तर दुसरीकडे ७ धरणांत केवळ २१ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता वाढू लागली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पिके अडचणीत सापडली आहेत़ तर दुसरीकडे ७ धरणांत केवळ २१ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता वाढू लागली आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये येलदरी आणि निम्न दुधना हे दोन मुख्य प्रकल्प असून, त्याचबरोबर गोदावरी नदीवरील ४ बंधारे आणि दोन मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होतो़ दरवर्षी पावसाळ्यात हे धरण भरल्यानंतर यातील पाणी उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी वापरले जाते़ यावर्षी पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे़ परंतु, पाऊस गायब झाल्याने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे़ येलदरी धरणामध्ये केवळ ३ टक्के साठा झाला आहे तर निम्न दुधना प्रकल्पात ३९़८३ टक्के, झरी प्रकल्पामध्ये ३० टक्के, करपरा मध्यम प्रकल्पात २४ टक्के, मासोळी मध्यम प्रकल्पात १६ टक्के साठा उपलब्ध आहे़ डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यात केवळ ४़५ टक्के साठा उपलब्ध असून, पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्यात तर पाणीच शिल्लक नाही़ यावर्षीच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन दिवस पाऊस झाला़ परंतु, त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवली आहे़ त्यामुळे धरणातील पाणी वाढण्याऐवजी कमी होत चालले आहे़ एकीकडे पावसाअभावी पिके धोक्यात आहेत तर दुसरीकडे धरणांमध्ये पाणीसाठा नसल्याने आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखीच गंभीर होण्याची चिन्हे आहेत़