शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

१६० उमेदवारांचे २०५ अर्ज

By admin | Updated: September 28, 2014 00:13 IST

परभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात अखेरच्या दिवशी एकूण १६० उमेदवारांनी २०५ अर्ज दाखल केले़

परभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात अखेरच्या दिवशी एकूण १६० उमेदवारांनी २०५ अर्ज दाखल केले़ दिग्गज नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करून तर काहींनी तर साधेपणाने अर्ज दाखल केले़ परभणी विधानसभा मतदार संघातून ३५ उमेदवारांनी ४९ अर्ज दाखल केले़ त्यामध्ये काँग्रेसकडून खान इरफानूर रहेमान यांनी ३ अर्ज दाखल केले़ राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर प्रताप देशमुख यांनी अर्ज दाखल केला़ रिपाइं आठवले गट व अपक्ष असे दोन अर्ज डी़ एऩ दाभाडे यांनी दाखल केले़ तसेच खान रहेमान खान (अपक्ष), सय्यद नौमान हुसेनी सय्यद यांनी मुस्लीम लीग व अपक्ष, मन्सूर खान यांनी समाजवादी पार्टीकडून, राहुल कांबळे यांनी अपक्ष, मुमताज अमजद खाँ (अपक्ष), खमीसा मुजाहेद (अपक्ष), मंदार बर्दापूरकर (अपक्ष), गंगाधर जवंजाळ (राष्ट्रवादी काँग्रेस), लतिफ खान, सईदोद्दीन सिद्दीकी, उद्धव रंगराव पवार, गफार अजीज शेख, प्रमोद मारोती पंडितकर सर्व अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला़ जाकीर कुरेशी यांनी एमआयएमकडून दोन अर्ज दाखल केले़ रिपाइं गवई गटाकडून दिलीप खंदारे यांनी अर्ज दाखल केला़ सय्यद खालेद यांनी एमआयएमकडून दोन व एक अपक्ष अर्ज दाखल केला़ हाफीज अहमद एकबाल यांनी एमआयएमकडून दोन व अपक्ष अर्ज दाखल केला़ हाश्मी मिनाज यांनी अपक्ष म्हणून तर अशोक बाबाराव अंबोरे यांनी आंबेडकर नॅशनल काँग्रेस आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला़ सय्यद आयतुल्लाह यांनी अपक्ष अर्ज दाखल केला़ अनिल मुदगलकर, हाश्मी स़, पांडुरंग धाडगे, सुधीर साळवे, मीराताई सामले, जमील अ़ खान, अभिजित जोशी या सर्वांनी अपक्ष अर्ज दाखल केले़ आनंद भरोसे यांनी भाजपाकडून तर देवराज बर्वे यांनी शिवसेना व अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला़ डॉ़ राहुल पाटील यांनी शिवसेनेकडून तर विनोद दुधगावकर यांनी मनसेकडून अर्ज दाखल केला़ अ‍ॅड़ अफजल बेग यांनी अपक्ष म्हणून तर समाधान पोटभरे यांनी बसपा व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले़ परभणी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या वतीने युवा सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राहुल पाटील यांनी रॅली काढून उमेदवारी दाखल केली़ शहरातील रंगनाथ मंदिर येथून निघालेली ही रॅली शहरातील शनिवार बाजार, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोड मार्गे जिल्हा कचेरी परिसरात दाखल झाली़ त्यानंतर येथे झालेल्या जाहीर सभेत खा़ बंडू जाधव यांनी डॉ़ पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले़ शिवसेनाप्रमुखांचे बोट धरून महाराष्ट्रात आलेली भाजपा शिवसेनेला संपवायला निघाली आहे़ परंतु, शिवसेना ही सर्वांना पुरून उरणार आहे़, अशी टीकाही यावेळी खा़ जाधव यांनी केली़ यावेळी बोलताना डॉ़ राहुल पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली़ परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे़, तो अभेद्यच राहणार आहे़ यावेळेसही काँग्रेसचा दारूण पराभव करू, असेही यावेळी ते म्हणाले़ यावेळी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख माणिक पौंढे, तालुकाप्रमुख नंदू आवचार, अनिल डहाळे, मनपा गटनेते अतुल सरोदे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे, संदीप भंडारी, संजय गाडगे, छगन मोरे, गजानन देशमुख, भाविसेचे अमित गिते, रामप्रसाद रणेर, सुदाम सोनवणे, सदाशिव देशमुख, माणिक सूर्यवंशी, संदीप झाडे, सोनाली सूर्यवंशी, प्रशांत शिंदे, गणेश कच्छवे, संदीप राठोड, बाळासाहेब ढोणे, मुरलीधर देशमुख, अंकुश मस्के आदींची उपस्थिती होती़ भाजपाकडून शनिवारी आनंद भरोसे यांनी रॅली काढून उमेदवारी दाखल केली़ रॅलीमध्ये अ‍ॅड़ विजय गव्हाणे, अजय गव्हाणे, राजेश देशपांडे, जगन्नाथ गरुड यांची उपस्थिती होती़ शहरातील जिंतूर रोडपासून सुरू झालेली ही रॅली शासकीय दवाखाना, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायणचाळ मार्गे शिवाजी पुतळा परिसरात दाखल झाली़ येथे रॅलीचा समारोप झाला़ यावेळी विजयराव गव्हाणे, उमेदवार आनंदराव भरोसे, जि़प़ सदस्य गणेशराव रोकडे यांनी मार्गदर्शन केले़ यावेळी दिलीप ठाकूर, मोकींग खिल्लारे, दिनेश नरवाडकर, मधुकर गव्हाणे, संजय शेळके, लिंबाजी भोसले, राजेश देशपांडे, जगन्नाथ गरुड, यशवंत भालेराव, सुभाष धरणे, वसंत शिंदे, जानूबी, रामभाऊ आरगडे, डॉ़ भिखूदास लाटे, ब्रह्मानंद सावंत, पप्पू जाधव, भुजंगराव धस, अरुण कदम, रवि कदम, विठ्ठलराव पऱ्हाड, गजानन लव्हाळे, किरण साबळे, यशवंत खाडे, गंगाराम शिंदे आदीेंची उपस्थिती होती़राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर प्रताप देशमुख यांनी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला़ यावेळी त्यांच्यासमवेत अ‍ॅड़ जावेद कादर, भीमराव वायवळ, विजय जामकर, रमाकांत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)