शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आवक २० हजार क्विंटलवर, भाव मात्र स्थिरच !

By admin | Updated: December 25, 2016 23:46 IST

लातूर : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसह खाजगी खरेदी केंद्रावर सोयाबीनची आवक हजारो क्विंटलवर आहे़

लातूर : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसह खाजगी खरेदी केंद्रावर सोयाबीनची आवक हजारो क्विंटलवर आहे़ मात्र, महिनाभरापासून दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांच्या पदरी मशागतीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे़ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शनिवारी १७ हजार क्विंटलची आवक असून उच्चांकी दर २ हजार ९७१ रूपये प्रतिक्विंटलचा आहे़पावसामुळे नदीकाठच्या अनेक गावातील हजारो हेक्टरवरील सोयाबीनमध्ये पाणी शिरले तर काही ठिकाणी पाण्यामुळे सोयाबीन काळे पडले होते़ शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा एकरी खर्च बेरीज केल्यास सध्या मिळणाऱ्या दरातून छदाम उरत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे़ त्यातही नोटबंदीमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला आहे़ शेतकऱ्यांना नगदी पैसे हवे असतील तर काही ठिकाणी व्यापारी कमी दराने शेतीमाल घेत आहेत़ लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा करण्यात आला होता़ चांगला पाऊस झाल्याने काही ठिकाणी उत्पन्न भरघोस झाले तर काही ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाहीत़ अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४ हजार रूपये तरी दर मिळणे अपेक्षित असताना दोन महिन्यांपासून दर स्थिरालेले आहेत़ परिणामी, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ लातूरच्या बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून १५ ते २० हजार क्विंटलपर्यंत सोयाबीन येत आहे़