शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.चे २० गुरुजी गायब

By admin | Updated: October 9, 2016 01:07 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे जवळपास वीस शिक्षक गेल्या पाच महिन्यांपासून गायब आहेत. मे महिन्यात झालेल्या सार्वत्रिक बदल्यानंतर ते शिक्षक बदली

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे जवळपास वीस शिक्षक गेल्या पाच महिन्यांपासून गायब आहेत. मे महिन्यात झालेल्या सार्वत्रिक बदल्यानंतर ते शिक्षक बदली झालेल्या ठिकाणी रुजूच झाले नाहीत. दरम्यान, गेल्या आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनी शाळेवर हजर न होणाऱ्या अशा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते.मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. तेव्हा गैरसोयीच्या शाळांत बदली झाल्यामुळे काही शिक्षक सोयीच्या शाळांमध्ये पदस्थापना मिळविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, प्रशासनाने त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे जवळपास २० शिक्षक नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून बदली झालेल्या शाळांत रुजूच झालेले नाहीत. परिणामी, अशा शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी शिक्षण सभापती विनोद तांबे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी शिक्षक देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात सभापती विनोद तांबे यांनी शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्याकडून शिक्षकांबाबत माहिती जाणून घेतली तेव्हा गैरसोय होत असल्यामुळे बदली झालेले शिक्षक शाळेवर रुजू झालेले नसल्याचे समजले. ते सर्व शिक्षक सोयीच्या ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये पदस्थापना मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. बदली झाल्यानंतरही बेकायदेशीरपणे गैरहजर असलेल्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्दड यांच्याकडे पालक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार अर्दड यांनी त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आठवडाभराचा कालावधी लोटला; पण अद्यापपर्यंत एकाही शिक्षकाविरुद्ध शिक्षण विभागाने कारवाई केलेली नाही, हे विशेष!