शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार कर्मचाऱ्यांचे १६ दिवसांचे वेतन कपात !

By admin | Updated: January 4, 2016 00:06 IST

लातूर : एसटीची सेवा अत्यावश्यक सेवा असून, कुठल्याही परिस्थितीत ती बंद ठेवता येत नाही़ मात्र लातूर जिल्ह्यातील पाचही आगारातील वाहक-चालकांनी

लातूर : एसटीची सेवा अत्यावश्यक सेवा असून, कुठल्याही परिस्थितीत ती बंद ठेवता येत नाही़ मात्र लातूर जिल्ह्यातील पाचही आगारातील वाहक-चालकांनी वेतनवाढीसाठी गेल्या महिन्यात दोन दिवस संप पुकारुन ही सेवा विस्कळीत केली होती़ त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने पाचही आगारातील २ हजार वाहक-चालकांचे १६ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे वाहक-चालक हादरले असून, संपावर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाने तशा नोटिसाही पाठविल्या आहेत़ लातूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार आहेत़ लातूर, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर या पाच आगाराचा त्यात समावेश आहे़ या आगारातील १ हजार वाहक व १ हजार चालक डिसेंबर महिन्यात पगारवाढीसाठी १७ व १८ तारखेला संपावर होते़ या कर्मचाऱ्यांनी एकही बस आगारातून बाहेर पडू दिली नव्हती़ त्यामुळे एसटीचे ६८ लाखांचे नुकसान झाले होते़ पूर्ण प्रवासी यंत्रणा विस्कळीत झाली होती़ चालक-वाहकांनी दोन दिवस आगारातच मुक्काम ठोकून बस हालू दिली नव्हती़ त्यामुळे हे नुकसान झाले होते़ दरम्यान, प्रशासनाने पगारवाढीचे आश्वासन दिल्यानंतर बस सेवा सुरळीत झाली़ त्यानंतर आता एसटी प्रशासनाने संपावर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे १६ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे़ संपातील कर्मचाऱ्यांना विभाग नियंत्रकांनी नोटिसा पाठविल्या आहेत़ राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयांतर्गत २ हजार वाहक-चालक या संपामध्ये सामिल झाले होते़ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अत्यावश्यक सेवा असल्याच्या सूचना देऊनही वेतनाच्या मागणीसह इतर मागणीसाठी दोन दिवस संप करण्यात आला़ या दोन दिवसासाठी १६ दिवसांचा पगार कपातीचा निर्णय शासनाने घेतला आहे़ या निर्णयानुसार लातूर विभागातील २ हजार वाहक-चालकांचे २१ कोटी रुपये कपात होतील़ या सर्व कर्मचाऱ्यांना लातूरच्या विभाग नियंत्रकांनी नोटिसा पाठविल्या आहेत़ ४कामगार संघटनेने पूर्वकल्पना न देता आंदोलन करुन दोन दिवस प्रवाशांना वेठीस धरले़ त्यामुळे एसटी महामंडळाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ शिवाय, एसटीची सेवा अत्यावश्यक सेवेत मोडते़ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना संप करता येत नाही़ याची माहिती असताना देखील वाहक-चालकांनी संप केला़ त्यामुळे शासनाने वेतन कपातीची कारवाई सुरु केली आहे, असे विभाग नियंत्रक डी़ बी़ माने यांनी सांगितले़ या निर्णयानुसार जिल्ह्यातील २ हजार कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले़