शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख शेतकºयांनी भरला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:37 IST

नांदेड: आॅनलाईनमध्ये येणाºया अडचणीवर मात करीत जिल्ह्यातील जवळपास २ लाख शेतकºयांनी पीक विमा भरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख आहे.

सुनील जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: आॅनलाईनमध्ये येणाºया अडचणीवर मात करीत जिल्ह्यातील जवळपास २ लाख शेतकºयांनी पीक विमा भरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१७-१८ अंतर्गत खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा भरण्यासाठी शासनाने गावपातळीवर सीएससीच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली़ बिगर कर्जदार शेतकºयांना अर्ज भरण्यास सुलभ व्हावे म्हणून कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चा आधार घेण्यात आला़, परंतु इंटरनेट आणि आॅनलाईन सर्व्हरमध्ये वारंवार येणाºया तांत्रिक अडचणीमुळे सेवा फेल ठरली असून पुन्हा बँकांचा आधार घ्यावा लागत आहे़पीक विमा कंपनीच्या सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी आणि सेवा केंद्रामध्ये होणारी शेतकºयांची आर्थिक लूट यामुळे सदर उपक्रम अपयशी ठरला़ त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी ओळखीच्या बँकेत पीक विमा भरणे पसंत केले़, परंतु तेथेही तांत्रिक अडचणी, अपलोडसाठी लागणारा वेळ आदींचा सामना करावा लागत आहे़ जिल्ह्यातील १ हजार ७०० पैकी ८०० सीएससी केंद्रांवर पीक विमा स्वीकारला जात आहे़ परंतु, सीएससी केंद्रावर पीक विमा स्वीकारण्यासाठी ५०, १०० रूपये घेतले जात असल्याने अनेक शेतकºयांनी सेंटरकडे पाठ फिरविली़ परिणामी बँकांमधील गर्दीत मोठी वाढ झाली आहे़दरम्यान, प्रत्येक तालुका, गावपातळीवर असलेल्या बँकांमध्ये शेतकºयांची गर्दी झाली़ तसेच पीक विमा स्वीकारत नसल्याने शेतकºयांनी देगलूर, भोकर येथे बँकांना टाळे ठोकले तर काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला़शेतकºयांचा वाढता संताप लक्षात घेऊन सीएससीचे प्रकल्प व्यवस्थापक आणि जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी तसेच इतर राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापक यांची जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन पीक विमा भरण्यास येणाºया अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देश दिले़ यानंतर बहुतांश बँकांनी पीक विमा भरण्यास सुरूवात केली़आजघडीला सीएससी सेंटर, राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वच शाखांमध्ये पीक विमा स्व्ीकारला जात आहे़ शेतकºयांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी हे जिल्हा अग्रणी बँकेचे जयंत वरणकर आणि सीएससीच्या प्रकल्प व्यवस्थापक यांच्याशी समन्वय ठेऊन आहेत़