शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन समितीवर १९ सदस्य बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:26 IST

जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली असली तरी २५ पैकी १९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली असली तरी २५ पैकी १९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. याची औपचारिक घोषणा निकालाच्या वेळी होणार असून, नगर परिषद गटासाठी ४ आणि नगर पंचायतीच्या एका जागेसाठी मतदान होण्याची चिन्हे आहेत.दर पाच वर्षांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यत्वासाठी निवडणूक घेतली जाते. जिल्हा परिषद गटातून १९ आणि नगर परिषद ४ व नगर पंचायत गटातून एक सदस्यांची निवड होते. यंदा जिल्हा परिषद गटातून १९ जागांसाठी १९ अर्ज आले आहेत. त्यामुळे या जागांसाठी मतदान होणार नाही, हे स्पष्ट आहे. तर सामंजस्यातून सर्वपक्षीय नेत्यांमध्ये जागा वाटप झाल्याचे सूत्रांनी सांगितले.यामध्ये शिवेसना ५, राष्ट्रवादी काँग्रेस ५, काँग्रेस १ आणि भाजपच्या ८ सदस्यांचा समावेश आहे. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीकडे निधी फारसा मिळत नव्हता. पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आ. राजेश टोपे यांनी जिल्ह्याला नियोजन समितीसाठी राज्य शासनाकडून वाढीव निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात प्रलंबित विविध विकास प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे नियोजित विकास कामे करण्यासही निधीची अडचण येणार नसल्याचे दिसून येते.२०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी जवळपास २५१ कोटींंचा निधी मिळणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्याला मिळणार असल्याने मातब्बरांनी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागावी या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जिल्हा परिषद गटातून १९ सदस्यांचेच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. तर नगर परिषद गटातून २८ आणि नगर पंचायत गटातून ६ अर्ज आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची १८ आॅगस्ट ही मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यासाठी २२ रोजी मतदान आणि २३ आॅगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.