शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाखांचा घातला गंडा

By admin | Updated: October 18, 2016 00:32 IST

औरंगाबाद : रेल्वेत तिकीट चेकर (टी.सी.) पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांची तब्बल १८ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे

औरंगाबाद : रेल्वेत तिकीट चेकर (टी.सी.) पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांची तब्बल १८ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.गौतम शेळके (रा. किन्ही,ता. सोयगाव), सचिन पवार (रा.मयूर पार्क), वेदप्रकाश दुबे (रा. भोपाळ) आणि शैलेश खान (रा. कोलकाता) अशी आरोपींची नावे आहेत. पो.निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी सांगितले की, नारेगावचे रहिवासी सुनील नवघरे हे रिक्षाचालक आहेत. आरोपी गौतम शेळके हा फिर्यादीच्या गावातील रहिवासी आहे. यामुळे त्यांच्यात जुनी ओळख आहे. नवघरे यांची पत्नी बेरोजगार आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपी शेळके हा नवघरे यांना भेटला आणि तुझ्या पत्नीला रेल्वेमध्ये नोकरी लावू शकतो, त्यासाठी ६ लाख रुपये लागतील, असे सांगितले. गावचा माणूस असल्याने नवघरे यांचा त्याच्यावर विश्वास बसला. आरोपी त्यांच्या घरी गेला. तेथे त्यांच्याकडून आणि भारतभूषण खंदारे, अमोल पवार यांच्याकडून प्रत्येकी ७० हजार रुपये असे एकूण २ लाख १० हजार रुपये घेतले. ही रक्कम परीक्षेचे हॉलतिकीट आणि वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी घेतल्याचे आरोपींनी सांगितले. काही दिवसांनंतर शेळके, पवार आणि दुबे हे तिघे नारेगावातील घरी गेले. तेथे त्यांनी हॉलतिकीट व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. उर्वरित रक्कम कोलकाता येथील शैलेश खान यांच्याकडे द्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले. २०१४ च्या सुरुवातीला १५ लाख ९० हजार रुपये तेथे नेऊन दिले.