शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

१७ जि़प़ शिक्षकांना पदस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:27 IST

इतर जिल्ह्यातून दाखल झालेल्या जिल्हा परिषदेच्या १७ प्राथमिक शिक्षकांना मंगळवारी जि़प़मध्ये समायोजनाच्या माध्यमातून पदस्थापना देण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : इतर जिल्ह्यातून दाखल झालेल्या जिल्हा परिषदेच्या १७ प्राथमिक शिक्षकांना मंगळवारी जि़प़मध्ये समायोजनाच्या माध्यमातून पदस्थापना देण्यात आली़अंतर जिल्हा बदली अंतर्गत जिल्ह्यामध्ये ११४ शिक्षकांची बदली झाली होती़ त्यापैकी ८२ शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे रुजू होण्यासाठी अर्ज केले होते़ त्यापैकी ६१ शिक्षकांना यापूर्वी जि़प़च्या वतीने समायोजनाच्या माध्यमातून पदस्थापना देण्यात आली होती़ उर्वरित २१ शिक्षकांना पदस्थापना देण्याच्या अनुषंगाने मंगळवारी जि़प़च्या सभागृहात समायोजन प्रक्रिया घेण्यात आली़ यावेळी २१ पैकी १७ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली़उर्वरित ४ पैकी एक शिक्षक आजारी असल्याने उपस्थित राहू शकला नाही तर तीन शिक्षकांनी नियुक्त्या घेतल्या नाहीत़ त्यांना यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला असून, हे शिक्षक जि़प़ने दिलेल्या जागेवर रुजू न झाल्यास त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यामध्ये पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़ समायोजन प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, शिक्षणाधिकारी आशा गरुड, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भावनाताई नखाते आदींची उपस्थिती होती़ या संदर्भात माहिती देताना शिक्षणाधिकारी गरुड म्हणाल्या की, जिल्ह्यातील जि़प़ शाळांमधील शिक्षकांची आवश्यकता लक्षात घेवून समायोजित करण्यात आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या आहेत़उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी सांगितले की, शिक्षकांची जास्तीत जास्त रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने जि़पक़डून प्रयत्न केले जात असून, पारदर्शक पद्धतीने समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली़