शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:25 IST

जायकवाडी प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्याने रब्बी हंगामातील दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जायकवाडी प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्याने रब्बी हंगामातील दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.परभणी जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम घेतले जातात. खरीप हंगाम हा शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हंगाम असला तरी रबी हंगामावरही अनेक शेतकºयांची भिस्त असते. या हंगामावरही शेतकरी लक्ष केंद्रीत करतात. सरासरी सर्वच शेतकरी दोन्ही हंगाम घेतात. परभणी जिल्ह्यात रब्बी हंगाम हा परतीच्या पावसावर अवलंबून आहे. गहू, ज्वारी, हरभरा, करडई ही पिके रब्बी हंगामात घेतले जातात.यावर्षी खरीप हंगामामध्ये सुरुवातीचे दोन महिने पावसाने ताण दिल्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट आली असली तरी रबी हंगामात मात्र शेतकºयांसाठी चांगले दिवस आले आहेत.परभणी जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत अधिक आहे. येलदरी, निम्न दुधना या दोन प्रमुख प्रकल्पाबरोबरच करपरा आणि मासोळी या मध्यम प्रकल्पांवर शेत जमिनीचे सिंचन होते. त्याचबरोबर जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा परभणी जिल्ह्यातून गेला आहे. त्यामुळे या कालव्यावरही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील जमीन सिंचनाखाली येते. यावर्षी जायकवाडी प्रकल्पात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्याचप्रमाणे निम्न दुधना प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पात १४ टक्के तर येलदरी प्रकल्पात ११.५७ टक्के पाणीसाठा झाल्याने खरीप हंगामामध्ये जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे यावर्षीचा रब्बी हंगाम परभणी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी आशादायक ठरत आहे.