शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

१४० अंगणवाड्या ‘आयएसओ’च्या स्पर्धेत

By admin | Updated: June 15, 2014 00:58 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील अंगणवाड्या या सर्वांसाठी पथदर्शक ठराव्यात, तेथे करण्यात येणारे लहान मुलांचे संगोपन उत्कृष्टरित्या व्हावे, यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे

उस्मानाबाद : जिल्ह्यातील अंगणवाड्या या सर्वांसाठी पथदर्शक ठराव्यात, तेथे करण्यात येणारे लहान मुलांचे संगोपन उत्कृष्टरित्या व्हावे, यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुरूवातीला जिल्ह्यातील १४० अंगणवाड्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळावे, यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.गावकऱ्यांनीही आपल्या गावातील अंगणवाडी ही अधिकाधिक उत्कृष्ट असावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी प्रत्येक अंगणवाडीस भेट देवून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत. जिल्ह्यात अंगणवाडी कार्यकर्ती आणि पर्यवेक्षिका यांच्यामार्फत लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येवून शून्य ते तीन, तीन ते सहा वर्ष वयोगट, गरोदर व स्तनदा मातांची संख्या, वजन घेतलेल्या बालकांची संख्या, साधारण, मध्यम आणि तीव्र कमी वजन श्रेणीतील बालकांची संख्या आदींचे सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार तीव्र व मध्यम कमी वजनाच्या बालकांच्या पोषण आहाराकडे लक्ष देवून त्यांना साधारण श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. याशिवाय जिल्ह्यात २८ बाल विकास केंद्रेही स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक अंगणवाड्यांत माता बाल संरक्षण कार्ड तयार करण्यात आले असून, प्रत्येक बालकाची नियमित आरोग्य तपासणी, त्याचे नियमित लसीकरण याकडेही लक्ष दिले जाते. ही नियमितता कायम रहावी यासाठी आता प्रयत्न करण्यात येत आहेत. अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी सर्व बालविकास अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक घेऊन आयएसओ प्रमाणपत्र मिळण्यासाठी सर्व कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. के. नवले यांनी प्रत्येक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रत्येक अंगणवाडीस भेट देवून गावकऱ्यांचे सहकार्य घेऊन आणि त्यांना याचे महत्त्व पटवून सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)जिल्ह्यात १६६३ अंगणवाड्याजिल्ह्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एकूण १ हजार ६६३ अंगणवाड्या तर १९९ मिनी अंगणवाड्या आजअखेर कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ६०५ गावातील व वस्त्यांवरील अंगणवाड्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. तालुकानिहाय अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्यांची संख्या अशी : भूम तालुक्यात १५४ (२२), कळंब २१९ (२९), उस्मानाबाद १८० (१७), तुळजापूर २११ (२९), उमरगा १७६ (१०), परंडा १४६ (३२), लोहारा १४२ (१४), वाशी ११७ (१६), मुरूम १४७ (१६) आणि तेर १७१ (१४) (कंसातील आकडे मिनी अंगणवाड्यांचे आहेत.)९७ हजार बालकांना लाभया अंगणवाडयांमधून गरोदर माता, स्तनदा माता आणि शून्य ते सहा वयोगटातील बालकांसाठी पूरक पोषण आहार सुविधा देण्यात येते. याशिवाय किशोरवयीन मुलींसाठीही ही योजना राबविली जाते. जिल्ह्यात सध्या शून्य ते सहा वयोगटातील ९७ हजार ९८९ बालकांना या योजनेचा लाभ होत आहे. याशिवाय १८ हजार ९२४ गरोदर व स्तनदा माता आणि ४ हजार ४८८ किशोरवयीन मुलींनीही याचा लाभ घेतला आहे.