शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १३७६ नागरिकांकडे परवानाधारक बंदुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:05 IST

औरंगाबाद : दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल करणारे उद्योजक, वडिलोपार्जित धनाढ्य व्यक्तींसह, नामांकित व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी बंदूक, पिस्तूल बाळगण्याचा परवाना शासनाकडून ...

औरंगाबाद : दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल करणारे उद्योजक, वडिलोपार्जित धनाढ्य व्यक्तींसह, नामांकित व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी बंदूक, पिस्तूल बाळगण्याचा परवाना शासनाकडून दिला जातो. यासोबत सशस्त्र दलातून निवृत्त झालेले जवान, बँका, व्यावसायिक प्रतिष्ठानांना शस्त्र परवाना दिला जातो. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशाप्रकारे १ हजार ३७६ जणांकडे शस्त्र परवाने आहेत. परवानाधारक व्यक्तीला शस्त्रपरवान्याची गरज आहे अथवा नाही, याचा विचार करून त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाते.

औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १७ पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या व्यक्तींना शस्त्र परवाना देण्याचा शहरात पोलीस आयुक्तांना तर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांना अधिकार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १ हजार ३७६ नागरिकांकडे शस्त्र परवाने आहेत. दरवर्षी नियमित आयकर भरणारे, कोट्यवधींची उलाढाल असलेले व्यावसायिक, उद्योजक आणि गुन्हेगार, दहशतवाद्यांकडून ज्यांच्या जीविताला धोका आहेत, अशी व्यक्ती, राजकीय व्यक्तींना स्वत:च्या संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना दिला जातो. परवाना दिल्यानंतर विहित मुदतीत शस्त्र खरेदी करून याबाबतची नोंद परवान्यावर केल्यानंतरच शस्त्र बाळगण्याचा अधिकार मिळतो. शहरातील प्रतिष्ठीत, उद्योजक, व्यावसायिक आणि ज्यांच्या जीविताला धोका आहेत, अशा व्यक्तींसोबतच गनमॅन म्हणून नोकरी करण्यासाठी सैन्य दलातून निवृत्त झालेल्या जवानांना शस्त्र परवाना देण्यात आला आहे. यासोबतच बँकांनाही शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. हे शस्त्र सुरक्षित राहील, याची खबरदारी परवानाधारक व्यक्तीला घ्यावी लागते. गतवर्षीपर्यंत दरवर्षी शस्त्र परवान्याचे नूतनीकरण करावे लागे. आता तीन वर्षानंतर परवान्याचे नूतनीकरण केले जाते.

----------------

चौकट

शस्त्र परवाना स्टेटस सिम्बॉल

शस्त्र परवाना असणे काही जण स्टेट्स सिम्बॉल म्हणून मानतात. आटोकाट प्रयत्न करून ते शस्त्र परवाना मिळवितात. एवढेच नव्हे तर ते कायम शस्त्र जवळ बाळगतात.

-------------------

शस्त्र परवाना कसा काढायचा

शस्त्र परवाना काढण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय अथवा ग्रामीण भागातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे विहित नमुन्यातील अर्ज करावा लागतो. पाच रुपये कोर्ट फी स्टॅम्प या अर्जासाठी आवश्यक आहे. यासोबत तुम्हांला शस्त्र परवान्याची का गरज आहे, याविषयी स्पष्ट शब्दांत अर्ज आवश्यक असतो.

---------

शस्त्र परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रे

शस्त्र परवान्यासाठी अर्जदारांकडे रेशनकार्ड, मतदार कार्ड, तो आयकरदाता असल्याचा आणि कर भरल्याच्या चलनाची कॉपी, शहरातील दोन प्रतिष्ठीत व्यक्तींकडून अर्जदार चारित्र्यवान व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र, शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या स्वत: साक्षांकित प्रती, वयाचा दाखला (जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला) आदी कागदपत्रांसह अर्जाची आवश्यकता असते. अर्ज प्राप्त झाल्यावर अर्जदाराला शस्त्राची गरज आहे अथवा नाही, याचा निर्णय घेऊन शस्त्र परवाना देण्याविषयी दोन महिन्यांत निर्णय घेतला जातो.

------------------