शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

१३०० विद्यार्थ्यांना मिळणार संस्था शुल्क परत

By admin | Updated: November 25, 2015 23:21 IST

राजकुमार जोंधळे , लातूर राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अधिक दर्जेदार प्रशिक्षण देता यावे, यामुळे साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांकडूनच निधी उभारण्याचा प्रयत्न

राजकुमार जोंधळे , लातूरराज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अधिक दर्जेदार प्रशिक्षण देता यावे, यामुळे साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांकडूनच निधी उभारण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला. मात्र विविध विद्यार्थी संघटनांच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनानंतर हे शुल्क आता त्या-त्या विद्यार्थ्यांना परत देण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक ५ नोव्हेंबर रोजी राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्यावतीने जारी करण्यात आला आहे. परिणामी राज्यभरातील तब्बल ९० हजार तर लातूर जिल्ह्यातील १३०० विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर हे शुल्क जमा केले जाणार आहे. राज्यभरातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांकडून हे शुल्क सक्तिने वसूल करण्यात आले होते.लातूर जिल्ह्यात १० शासकीय, ४ निमशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या १४ संस्थामध्ये तब्बल १३०० विद्यार्थी विविध विद्याशाखेत औद्योगिक प्रशिक्षण घेतात. प्रारंभी विद्यार्थ्यांकडून संस्था विकास शुल्क हे स्विकारण्यात येते. हे शुल्क विविध विद्याशाखेनुसार वेगवेगळे आहे. किमान तीन ते चार हजारांपर्यंत हे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल केले जाते. प्रारंभी हे शुल्क ३६० रुपये होते, मात्र हा आकडा दिवसेंदिवस वाढत आता तो चार हजारांच्या घरात गेला आहे. लातूर जिल्ह्यासह राज्याच्या कांही भागात गेल्या तीन वर्षापासून दुष्काळ आहे. अशा दुष्काळातही सरकारकडून अधिक दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी साहित्य खरेदीच्या नावाखाली हे शुल्क वसूल करण्यात आले आहे. राज्यातील तब्बल ९० हजार विद्यार्थ्यांचे कोट्यवधी शुल्क संबंधित संस्थांनी वसूल केले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना शासनाच्यावतीने साहित्य पुरवठा करण्यात यावा, यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह विविध विद्यार्थी संघटनांचे जूनपासून आंदोलन सुरु होते. अखेर विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनापुढे सरकारने नमते घेत, यावर चर्चा घडवून आणली. नाव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालय स्तरावर झालेल्या चर्चेतून आणि समितीने दिलेल्या अहवालातून हे शुल्क परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे परिपत्रक ५ नोव्हेंबर रोजी राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. हे शुल्क विद्यार्थ्यांना त्या-त्या संस्थांनी तातडीने परत करावेत असे या परिपत्रकात म्हटले आहे. शुल्क माफ झाल्याने आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.