शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

१३०० लाभार्थींना पैसे मिळेनात

By admin | Updated: November 8, 2016 00:26 IST

जालना : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाने शासनाने कोट्यवधी रूपयांचा निधी घरकुल योजनेसाठी मंजूर केला आहे.

जालना : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाने शासनाने कोट्यवधी रूपयांचा निधी घरकुल योजनेसाठी मंजूर केला आहे. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यासाठी आलेले घरकुलाचे ११ कोटी ६० लाख रूपये शासनदरबारी परत करावे लागले. परिणामी १३०० लाभार्थी घरकुलांच्या निधीपासून अद्याप वंचित आहेत. घरकुल तसेच अन्य मुद्यांवरून जि.प. सर्वसाधारण सभा गाजली. जिल्ह्यातील १३०० लाभार्थ्यांचे दोन वर्षांपूर्वीचे घरकुलाचे अनुदान देणे असल्याची खंत जि.प. ज्येष्ठ सदस्य बप्पासाहेब गोल्डे यांनी सभागृहात मांडल्याने सत्ताधारी सुध्दा अनुत्तरित झाले. अनेक लाभार्थ्यांनी व्याजाने पैसे काढून घरकुल बांधले तरी सुध्दा त्याचे हक्काचे पैसे कधी देणार, असा सवाल त्यांनी सभागृहाला विचारला.सोमवारी दुपारी दोन वाजता अध्यक्ष तुकाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. सर्वसाधारण सभेला राष्ट्रगीताने सुरूवात झाली. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत २०१४ -२०१५ वर्षासाठी घरकुलासाठी शासनाकडून साडेअकरा कोटी रूपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे लाभार्थ्यांना पैसेच देण्यात आले नाही. परिणामी ३१ मार्च रोजी शासनाने दिलेला साडेअकरा कोटी रूपयांचा निधी शासनाला परत करावा लागला. आत्ता सर्व प्रक्रिया आॅनलाईन करा तेव्हाच पैसे देणार , अशी शासनाची भूमिका असल्याने अद्यापही प्रशासनाने जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे प्रक्रिया आॅनलाईन केली नसल्याची बाब पुढे आली आहे. लाभार्थी त्या- त्या तालुक्यांच्या पंचायत समितीत दररोज येऊन विचारणा करत असल्याने लाभार्थीना अनुदान कधी मिळणार, अशी खंत सदस्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी पाझर तलाव, बोअर, विहीर आणि छोटे मोठ्या प्रकल्पासाठी अल्पदरात जिल्हा परिषदेला जमिनी दिल्या. परंतु अद्यापही भूसंपादनचे पैसे दिले जात नाही. सिंचन विभागाने शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे पैसे मिळावे यासाठी सर्व कागदपत्रांसह पाठपुरावा करण्यात कमी पडत आहे. या सर्व प्रक्रियेची माहिती सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश रहाणे यांच्याकडे सदस्यांनी विचारली असता त्यांना सांगता आले नाही. जर तुम्हाला शासनदरबारी पाठपुरावाच करता येत नसेल तर शासनाकडून कसे पैसे मिळतील, असे संजय काळबांडे, भगवान तोडावत यांनी सांगितले. शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे हे शासनाकडूनच मिळायला पाहिजे. परंतु सभागृहाची मान्यता नसताना जि.प. शेष फंडातून यासाठी एक कोटी रूपये ठेवण्यात आले. ही निव्वळ धूळफेक असून, शेष फंडातून असे पैसे बाजूला ठेवणे चुकीचा पायंडा पाडत असल्याचे सदस्यांनी यावेळी नमूद केले. राज्यात आणि जि.प. मध्ये युतीची सत्ता असल्याने शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या भूसंपादनासाठी पैसे खेचून आणण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी शेतकऱ्यांच्या भूसंपादनासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून, शासनाकडून पैसे मिळताच शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे देण्यात येणार असल्याचे सांगितले.या चर्चेत राजेश राठोड, रामेश्वर सोनवणे, बाळासाहेब वाकुळणीकर, रवि राऊत, लक्ष्मण दळवी आदींनी सहभाग घेतला होता. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती ए.जे. बोराडे, समाज कल्याण सभापती शहाजी राक्षे, सभापती मीनाक्षी कदम, सभापती लीलाबाई लोखंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)