शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
6
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
7
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
8
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
9
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
10
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
11
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
12
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
13
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
14
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
15
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
16
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
17
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
18
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
19
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
20
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  

११४ गावांना अलर्ट़़़

By admin | Updated: July 7, 2014 00:21 IST

नांदेड : जिल्ह्यात दूषित पाणीपुरवठ्याबाबत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना सतर्कतेचे आदेश दिले आहेत़ मे २०१४ मध्ये जि़ प़ ने घेतलेल्या २१५६ पाणी नमुन्यांपैकी ६०५ नमुने दूषित आढळले आहेत़

नांदेड : जिल्ह्यात दूषित पाणीपुरवठ्याबाबत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना सतर्कतेचे आदेश दिले आहेत़ मे २०१४ मध्ये जि़ प़ ने घेतलेल्या २१५६ पाणी नमुन्यांपैकी ६०५ नमुने दूषित आढळले आहेत़ यात ग्रामीण भागातील ५५९ तर शहरी भागातील ४६ दूषित नमुन्यांचा समावेश आहे़जिल्ह्यात साथरोगांना आळा बसावा यासाठी जिल्ह्यात मान्सूनपूर्व उपाययोजना आरोग्य विभागाच्या वतीने हाती घेण्यात आल्या आहेत़ साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कृती योजनाही हाती घेण्यात आली असून जिल्ह्यातील ३९ गावे साथ जोखीमग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ मागील तीन वर्षांच्या काळात जलजन्य साथउद्रेक उद्भवलेली, मोठी यात्रा भरणारी आणि एकच पाण्याचा स्त्रोत असलेल्या गावांचा साथरोगदृष्ट्या जोखीमग्रस्त असलेल्या गावांचा समावेश आहे़ याशिवाय टंचाईग्रस्त, टँकरने पाणीपुरवठा होत असलेली गावे आणि नदीकाठच्या गावांनाही जोखीमग्रस्त समजण्यात येईल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे़ या गावांची यादी तयार करून जिल्ह्यात ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ३७७ उपकेंद्रांना देण्यात आली आहे़ या जोखीमग्रस्त गावात साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत पाणीस्त्रोतांचे परीक्षण करावे, परीक्षणात तपासणीचा अहवाल नकारात्मक असेल तर पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेस सतर्क करण्याचेही आदेश दिले आहेत़ संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडर पुरेशा प्रमाणात असल्याची खात्री करावी, टँकरने होणारा पाणीपुरवठा शुद्ध आहे की नाही याची खात्री करावी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किमान १५ दिवसांतून एकदा तरी अशा गावांना भेट देवून माहिती घ्यावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधीसाठा तपासावा आणि साथउद्रेक उद्भवल्यास उद्रेकाची माहिती मुख्यालयाला कळविण्याबाबत सूचना दिल्या आहेत़ मे महिन्यात आरोग्य विभागाने पाणीनमुने संकलीत करून त्याची तपासणी केली होती़ त्यात ग्रामीण भागातील १६३७ नमुन्यांपैकी ५५९ नमुने दूषित आढळले आहेत़ तर शहरी भागातील ५१९ नमुन्यांपैकी ४६ नमुने दूषित आढळले़ (प्रतिनिधी)सर्वाधिक ३४ गावे नांदेड तालुक्यातीलपाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत मान्सूनपूर्व स्वच्छता सर्वेक्षणात जिल्ह्यातील ११४ गावे तीव्र जोखीमग्रस्त आढळले आहेत़विशेष म्हणजे यात सर्वाधिक ३४ गावे हे नांदेड तालुक्यातील आहेत़ त्याखालोखाल मुखेड तालुक्यातील २५, मदुखेड तालुक्यातील १९, हिमायतनगर तालुक्यातील १७, नायगाव ८, कंधार, किनवट, अर्धापूर तालुक्यातील प्रत्येकी तीन गावांचा समावेश आहे़ या अहवालात जिल्ह्यातील ६५३ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले आहेत़ तर ६५६ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड दिले आहेत़ लाल कार्ड अर्थात धोकादायक अशी एकही जिल्ह्यातील ग्रामपंचायत ठरली नाही़