शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मोदीखान्यात ११ लाखांची घरफोडी

By admin | Updated: November 9, 2016 01:04 IST

जालना : घरातील रोख ९ लाख ८० हजार आणि १ लाख ७४ हजार रूपयाचे सोन्याचे दागिने असा ११ लाख ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली.

जालना : दिवाळी निमित्त बाहेगावी गेल्याची संधी साधून शहरातील कॉलेज रोडवरील मोदीखाना येथील निलेश निर्मलचंद कासलीवाल यांच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील रोख ९ लाख ८० हजार आणि १ लाख ७४ हजार रूपयाचे सोन्याचे दागिने असा ११ लाख ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली.मोदीखाना निलेश निर्मलचंद कासलीवाल (४४) त्यांची पत्नी आणि दोन मुले हे शनिवारी ५ नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त सिंधवाडा येथे नातेवाईकाकडे गेले होते. घरी त्यांचे वडील निर्मलचंद (७६) हे एकटेच घरी होते. ते इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर झोपले असताना चोरट्यांनी संधी साधत सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील रोख ९ लाख ८० हजार रूपये आणि १ लाख रूपयाचे १४५ गॅ्रम सोन्याचे दागिने चोरून नेले. यात १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ३० गॅ्रमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ५० गॅ्रमचे सोन्याचे ब्रासलेट, १० ग्रॅमचे कानातले, १५ गॅ्रमचा सोन्याचा हार, २० गॅ्रमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ५ ग्रॅम सोन्याचे मणी असा एकूण ११ लाख ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. नीलेश कासलीवाले हे सिंधवाडा येथून मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता कुंटुंबियांसह घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तोडण्यात आल्याचे दिसले. त्यांनी तातडीने घरात प्रवेश करून घरातील कपाटाची पाहणी केली. तेव्हा त्यांना घरातील दोन कपाटीची कुलूप तोडून त्यातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे समजले. त्यांनी साडेचार वाजता सदर बाजार पोलिस ठाण्याला याची माहिती दिली. सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील काकडे आणि सहकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. नीलेश कासलीवाल यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)