शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१०४ सदस्यांवर जात वैधता प्रमाणपत्राची टांगती तलवार !

By admin | Updated: October 18, 2016 00:09 IST

लातूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी विहीत मुदतीत गटविकास अधिकाऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते.

लातूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी विहीत मुदतीत गटविकास अधिकाऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. परंतु, अद्यापही हे प्रमाणपत्र सादर न केल्याने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या १०० सदस्यांवर जात वैधता प्रमाणपत्रांबाबत दुपारी ४ वाजता सुनावणी घेण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील ग्रामपंचायत सदस्यांनी विहीत मुदतीत आपले जात वैधता प्रमाणपत्र गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक होते. परंतु, कालावधी होऊनही जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया अनेक ग्रा.पं. सदस्यांनी केली नसल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सूचना करून जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, शिरूर अनंतपाळ व जळकोट तालुक्यांतील २८ गावांतील १०४ सदस्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. तर उर्वरित ९ तालुक्यांतील ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्रांचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर न केल्याने त्यांनाही अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंबुलगा (स.), भिंगोली, चामरगा, कळमगाव, सांगवी (घु.), साकोळ, धामणगाव, थेरगाव, येरोळ, शेंद, कानेगाव, कांबळगा, उमरदरा, कारेवाडी, जोगाळा, डोंगरगाव बोरी, होनमाळ, तळेगाव (दे.), लक्कड जवळगा, बोळेगाव (बु.), शिवपूर, डिगोळ, सुमठाणा, हालकी, बिबराळ, हिप्पळगाव, तिपराळ अशा २७ गावांतील ९६ सदस्यांच्या व जळकोट तालुक्यातील अतनूर येथील पाच सदस्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत सुनावणी होणार असल्याने त्यांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार राहणार आहे. (प्रतिनिधी)