अशोक कारके ,औरंगाबादशहरात जवळपास अडीच लाख विद्युत ग्राहक आहेत. त्यापैकी १० हजार विद्युत मीटर बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी इन्फ्रा रेडचे १२ हजार मीटर मिळाले असून, त्यापैकी जुन्या ग्राहकांचे १० हजार मीटर बदलण्यात येणार आहेत. २ हजार नवीन ग्राहकांकडेही हेच मीटर बसविण्यात येणार आहेत, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्राहकांना अचूक वीज बिल मिळावे म्हणून महावितरण आय आर (इन्फ्रा रेड) आणि आर एफ ( रेडिओ फ्रिक्वेन्सी) हे नवीन मीटर बसवीत आहे. या मीटरची रीडिंग मशीनद्वारे घेतली जाते. त्यामुळे अचूक रीडिंग येते आणि ग्राहकांना अचूक बिल मिळते. शहरातील काही ग्राहकांनी मीटरच्या तक्रारी कंपनीकडे केल्या होत्या. त्या मीटरची तपासणी केल्यानंतर मीटर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी आणि ग्राहकांच्या मागणीनुसार जुने जवळपास १० हजार मीटर बदलण्यात येणार आहेत. जुन्या मीटरच्या ठिकाणी आय आर (इन्फ्रा रेड) हे मीटर बसविण्यात येणार आहेत. तसेच नवीन दोन हजार ग्राहकांनाही हेच मीटर बसविण्यात येणार आहेत. सरासरी बिलिंगमुळे ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता.
शहरात १० हजार विद्युत मीटर बदलणार
By admin | Updated: August 6, 2015 01:04 IST