शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या डागडुजीसाठी १० लाखांचा निधी मंजूर

By admin | Updated: June 23, 2016 01:33 IST

औरंगाबाद : शहरात महापालिकेच्या ७० शाळा सुरू आहेत. अनेक शाळेच्या इमारतींची अवस्था अत्यंत वाईट आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने १०

औरंगाबाद : शहरात महापालिकेच्या ७० शाळा सुरू आहेत. अनेक शाळेच्या इमारतींची अवस्था अत्यंत वाईट आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश बुधवारी स्थायी समितीने दिले.मिटमिटा येथील शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही. या भागातील एक सामाजिक सभागृह द्यावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेवक रावसाहेब आमले यांनी केला. यंदा दहावी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविण्याचा मान मिटमिटा शाळेतील विद्यार्थिनीला मिळाला. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शाळांमध्ये सोयी-सुविधा नाहीत, असा आरोप शेख समिना यांनी केला. मनपा शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक इतर खाजगी शाळेत विद्यार्थी टाकण्याचा सल्ला पालकाला देतात, असा आरोप राज वानखेडे यांनी केला. कैलास गायकवाड यांनी माध्यमिक शाळांमध्ये तज्ज्ञ शिक्षक नाहीत. सिडको एन-७ भागातील शाळेचे छत कोसळले आहे. अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे मकरंद कुलकर्णी यांनी नमूद केले. मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांना खुलासा करताना सांगितले की, मिटमिटा शाळेतील खोल्या बांधकामाचा प्रस्ताव आला होता. मात्र, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नव्हती, यंदा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात तरतूद करता येऊ शकते. यंदा किती तरतूद आहे, असा प्रश्न सभापतींनी केल्यानंतर १० लाख रुपये तरतूद असल्याचे पवार यांनी सांगितले.