शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार १० लक्ष वृक्षलागवड

By admin | Updated: June 30, 2017 23:27 IST

हिंगोली : महाराष्ट्रात कृषी दिनानिमित्त ४ कोटी वृक्षलागवड केली जाणार असून, त्याच धर्तीवर एकट्या हिंगोली जिल्ह्यात ७ लाख ६६ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : महाराष्ट्रात कृषी दिनानिमित्त ४ कोटी वृक्षलागवड केली जाणार असून, त्याच धर्तीवर एकट्या हिंगोली जिल्ह्यात ७ लाख ६६ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. परंतु विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये आदींनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतल्यामुळे १० लाख ३० हजार वृक्षलागवड होणार असल्याची माहिती वन विभागाकडून मिळाली आहे. वनविभागाच्या पाच तर समाजिक वनीकरण विभागाच्या ७ अशा एकूण १२ रोपवाटिका जिल्ह्यात आहेत. प्रत्येक रोपवाटिकेत रोपे उपलब्ध करुन दिली आहेत. यामध्ये वनविभागाच्या रोपवाटिकेत हिंगोली तालुक्यातील कोपरवाडी, जांभरुण, येडशी, सिंदगी, घोडा अडीच लाख रोपे, तर औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव, सिद्धेश्वर, माथा आणि जलालदाभा येथील रोपवाटिकेत ३ लाख रोपे, वसमत तालुक्यातील राजवाडी, डोणवाडा, वापटी, सिरळी येथे ३.५० लाख, सेनगाव तालुक्यातील खुडज, वडहिवरा, हनकदरी, तांदूळवाडी, येलदरी येथे ३ लाख, वारंगा येथे १.५० लाख तर सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकेत हिंगोली तालुक्यातील जोडताळा येथील आधुनिक रोपवाटिकेत १ लाख, वन उद्यान ५० हजार, सेनगाव येथील रोपवाटिकेत १ लाख, ब्राह्मणवाडा येथील रोपवाटिकेत ५० हजार, कळमनुरीतील मध्यवर्ती रोपवाटिकेत ३ लाख, वसमत तालुक्यातील खाजमापूर येथील रोपवाटिकेत २ लाख आणि औंढा नागनाथ तालुक्यातील मार्डी येथील रोपवाटिकेत ५० हजार अशी विविध जातीची रोपे उपलब्ध आहेत. मागील वर्षी एकूण ५ लाख ३५ हजार २६१ रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ८५. २५ टक्के रोपे वाचली असल्याचा या विभागाचा आढाव्याअंती अहवाल आहे. यंदाही वृक्ष लागवडीसाठी अनेक शाळा, महाविद्यालये, संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी पुढे आल्याने, वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याच विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले. यामध्ये वृक्ष प्रजातीनिहाय रोपवाटिकेत रोपे उपलब्ध आहेत. यामध्ये जीवनदायी वृक्षात वड, उंबर, पाखर, पिंपळ. देवालये किंवा मंदिराभोवती लावण्यास योग्य असलेल्या वृक्षामध्ये वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, चिंच, चाफा, कडूनिंब यांचा समावेश आहे. उद्यानयात लावण्यास योग्य झाडे जलदगतीने वाढणाऱ्या झाडामध्ये बकाण, भेंडी, पांगरा, आकाशनिंब, महारुख, शाल्मली, कदंब आदी झाडांचा समावेश आहे. तर वनशेतीसाठी साग, बांबू, आवळा, अंजीर, चिंच, करवंद आदी अशी विविध प्रकारची झाडे उपलब्ध आहेत.