शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची वृक्षदिंडी

By admin | Updated: June 29, 2017 01:34 IST

जिल्ह्यातील गावा-गावात अधिकाधिक वृक्षलागवड करण्यात यावी, त्यांचे पूर्णत: संगोपन व्हावे, यासाठी

 चार ठिकाणी सभा : वृक्षारोपणाबाबत जनजागर लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील गावा-गावात अधिकाधिक वृक्षलागवड करण्यात यावी, त्यांचे पूर्णत: संगोपन व्हावे, यासाठी जिल्हापरिषद चंद्रपूरअंतर्गत वृक्षदिंडीला सुरुवात करण्यात आली. वृक्षदिंडीचा प्रारंभ मंगळवारी जिल्हा परिषदेमधून करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते वृक्षदिंडीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. शालेय लेझिम पथकासह जि.प.चे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यासह जेटपुरा गेट येथे जावून अध्यक्ष भोगंळे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन करुन वृक्षदिंडी पुढीाल प्रवासाकरिता मार्गस्त झाली. वृक्षदिंडीचे चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली या गावात स्वागत झाले. यानंतर यागावात वृक्षदिंडीद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय पुस्तके भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, अर्थ व बांधकाम सभापती संतोष तगडपल्लीवार, समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, जिल्हा परिषदचे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. वृक्षदिंडी चार दिवस जिल्ह्याभर गावा-गावात भ्रमण करुन वृक्षरोपण व संगोपणाविषयी जनजागरण करणार आहे. या वृक्षदिंडी द्वारा गावा- गावात सभा, बैठका, घेवून ग्रामस्थांना वृक्षलागवड करण्याची विंनती करणार आहे. वृक्षदिंडी शुभारंभ प्रसंगी प्रास्ताविक व आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी मानले. यावेळी जि.प.चे सर्व अधिकारी,कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावली, मूल, सिंदेवाही, येथे बैठक पार पडली. यावेळी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले.