शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात कामासाठी गेलेल्या युवकांची अखेर सुटका

By admin | Updated: April 23, 2016 01:03 IST

तालुक्यातील आठ युवक मागील २-३ महिन्यांपासून तेलंगणा येथील एका कंपनीत काम करण्यासाठी गेले.

सावली : तालुक्यातील आठ युवक मागील २-३ महिन्यांपासून तेलंगणा येथील एका कंपनीत काम करण्यासाठी गेले. मात्र कंपनी प्रशासन त्यांना कामाचा मोबदला न देता त्यांना गावाकडे परत येऊ देत नव्हते. दरम्यान, श्रमिक एल्गारच्या तक्रारीनंतर अपर पोलीस अधीक्षक राजपूत यांनी तेलंगाणा पोलिसांचय मदतीने या कामगारांची शुक्रवारी सुटका केली. सावली तालुक्यातील चारगाव येथील चंद्रशेखर गजानन गावतुरे, समिर श्यामकुमार मडावी, जयपाल अरूण गेडाम, नागेश कपील कुमरे, राकेश शांताराम गुरनुले, मोसम पत्रू आत्राम, शरद वेटे, रामा भैयाजी मोहुर्ले हे युवक काम करण्यासाठी सूर्यभान रामटेके यांच्यासोबत ७ फेब्रुवारीला तेलंगानातील येमुलवाडा येथे गेले. रामटेके यांनी तिथे पोहचल्यावर शंकर नामक ठेकेदाराकडे या मजुर युवकांना कामासाठी सोपविले. शंकर ठेकेदाराने येमुलवाडा येथील श्रीराम कोरी या दगडाच्या खाणीत या युवकांना काम दिले. त्यांचेकडून नियमीत काम करवून घेतले. मात्र मजुरांना गावाकडे परत येण्यासाठी मनाई केल्या जात आहे. मजुरांचा छळ केल्या जात आहे व मजुरीही दिल्या जात नसल्याची तक्रार पालकांनी श्रमिक एल्गारकडे केली. मजुरांची अडचण लक्षात घेता ठेकेदाराचे तावडीतून सुटका करण्याची मागणी निवेदनाद्वारे श्रमिक एल्गारचे महासचिव विजय कोरेवार यांच्या नेतृत्वात पालकांनी अपर पोलीस अधीक्षक राजपूत यांच्याकडे केली. त्याची दखल घेत राजपूत यांनी तेलंगणा सूत्रे हलवित कामगारांची सुटका केली. (शहर प्रतिनिधी)