शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच सांगा, जगायचे कसे ?

By admin | Updated: July 21, 2014 23:46 IST

जून आणि जुलै महिन्यातील काही दिवस पावसाने दडी मारल्याने यावर्षी पाहिजे तशी भाजीपाल्याची बाजारात आवक नाही. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. भाजीपाला चाळीस

भाजीपाल्यांचे भाव गगनाला : गृहिणींचे बजेट कोलमडलेचंद्रपूर : जून आणि जुलै महिन्यातील काही दिवस पावसाने दडी मारल्याने यावर्षी पाहिजे तशी भाजीपाल्याची बाजारात आवक नाही. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. भाजीपाला चाळीस रुपयांहून अंशी रुपयांपर्यंत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे गृहीणींच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. महागाईच्या विळख्यामुळे कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी कशी करावी, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची मजुरी केवळ भाजीपाला खरेदीमध्येच जात आहे. वाढत असलेल्या जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत केवळ हातमजूरी करुन आपले जीव जगणारा मजुरवर्गच आता त्रस्त झाला आहे. सध्यास्थितीत ग्रामीण भागात १०० ते १५० रुपये रोजी तर शहरामध्यये २०० ते ३०० रुपये मजूरी मिळते. मोलमजुरी करुन जीवन जगणाऱ्या मजुरांना तर, जगणे कठीण झाले आहे.भाजीपाल्यापासून ते किराणा सामान आणता- आणता त्याची मिळालेली मजूरी आणि होणारा खर्च याचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने दिवसेंदिवस चिंता वाढत आहे.बाजारातील जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव आणि दररोजच्या रोजगारासाठी करावी लागणारी वणवण याचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने सर्वसामान्य कुटुंबासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. तुंटपूंज्या मिळणाऱ्या मजुरीत व जीवनावश्यक वस्तूंचा खर्च, शैक्षणिक खर्च, प्रवास आणि ऐनवेळी येणाऱ्या काही खर्चाचा हिशेब केल्यानंतर मजुरी व खर्च याचा काहीही ताळमेळ बसत नाही. शासकीय नोकरी करणाऱ्यांना दरमहिन्यात वेतन मिळते, मात्र हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचा कुणी विचार करणार का, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांसह मजूर वर्गातून केला जात आहे.(नगर प्रतिनिधी)