शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी घोडाझरीचा ‘ओव्हर फ्लो’ जरा कठीणच

By admin | Updated: August 21, 2016 02:49 IST

सद्या स्थितीत पावसाची एकंदर स्थिती आणि गती लक्षात घेता यावर्षी घोडाझरीचा ‘ओव्हर फ्लो’ मुश्किलच दिसत आहे.

नागभीड : सद्या स्थितीत पावसाची एकंदर स्थिती आणि गती लक्षात घेता यावर्षी घोडाझरीचा ‘ओव्हर फ्लो’ मुश्किलच दिसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून तलाव ‘ओव्हर फ्लो’ होत नसल्याने पावसाळी पर्यटकांचा चांगला हिरमोड होत आहे.२०१३ साली घोडाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला होता. त्या अगोदरही हा तलाव अनेकदा ओव्हर फ्लो झाला. पण गेल्या तीन वर्षांपासून ओव्हर फ्लोच्या बाबतीत हा तलाव सतत हुलकावणी देत आहे. यावर्षी पावसाळ्याच्या प्रारंभ अतिशय दमदार पाऊस झाल्याने या तलावाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली होती. असाच पावसाचा जोर कायम राहिला तर घोडाझरी तलाव यावर्षी निश्चितच ओव्हर फ्लो होईल असा अनेकांचा अंदाज होता. पण हा अंदाज आता अंदाजच राहण्याची शक्यता आहे. अजूनही तलाव ओव्हर फ्लो होण्यास आणखी दोन फुट पाण्याची गरज असून ही उणीव भरून काढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.‘ओव्हर फ्लो’ न होण्यास आणखी एक असे कारण सांगण्यात येते की, आता लवकरच घोडाझरी तलावाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. एकदा घोडाझरीतून शेतीसाठी पाणी सुरू झाले की, रोज हजारो लिटर पाण्याचा उपसा या तलावातून होत राहील. त्यामुळेही ‘ओव्हर फ्लो’ होण्यास मोठी आडकाठी निर्माण झाली आहे. आता शेतीसाठी पाणी ही शेतकऱ्यांची आवश्यक गरज निर्माण झाली असून कालवे व्यवस्थित असते, तर १५ आॅगस्टपासूनच पाणी सोडणे सुरू करण्यात आले असते. पण ते आता एखाद्या आठवड्यात निश्चित सुरू होणार आहे.एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून घोडाझरीची पूर्व विदर्भात प्रसिद्ध आहे. या घोडाझरीवर पर्यटकांची वर्षभर गर्दी तर असतेच. पण त्याचबरोबरच घोडाझरीच्या ओव्हर फ्लोचा खास एक पर्यटक वर्ग आहे. हा वर्ग नेहमीच घोडाझरी ओव्हर फ्लो होण्याची प्रतीक्षा करीत असतो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या पर्यटक वर्गाला या प्रतीक्षेवरच समाधान मानावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)