शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्षेत्राच्या अटींचा बळीराजाला फास

By admin | Updated: September 21, 2015 00:47 IST

परवानाधारक सावकाराकडील कर्जमाफ करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसा शासननिर्णय काढला.

सावकाराची कर्जमुक्ती फसवी : ६४ पैकी सहा पात्र, जाचक अटीने केला शेतकऱ्यांचा घातचंद्रपूर : परवानाधारक सावकाराकडील कर्जमाफ करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसा शासननिर्णय काढला. मात्र, पात्रतेचे निकाल जटील असल्याने तालुक्यातील ६४ शेतकऱ्यांपैकी सहा शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत, केवळ परवानाधारक सावकाराच्या कार्यक्षेत्राच्या अटीमुळे अद्याप ५८ शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती सावकारी कर्जाचा फास कायम आहे.शासननिर्णय आल्यानंतर सहायक निबंधक सहकारी कार्यालयाने तालुक्यातील १९ परवानाधारक सावकारांना कर्जदार शेतकऱ्यांची यादी मागितली. त्यातील ११ सावकारांनी तालुक्यातील ७२ गावांतील ४१० कर्जदारांची यादी निबंधक कार्यालयाला दिली. त्यापैकी ६४ कर्जदार व्यक्ती सातबाराधारक शेतकरी असल्याची अंतिम माहिती तलाठी कार्यालयात पाठविली. अंतिम छानणीत ६४ शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले. मात्र, शासननिर्णयानुसार परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीस कर्ज दिले होते. त्यामुळे या योजनेसाठी संबंधित शेतकरी पात्र ठरणार नाही, अशी अट होती. त्यामुळे केवळ ६४ शेतकऱ्यांपैकी सहा शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. वरोरा तालुक्यात १९ परवानाधारक सावकार आहेत. त्यातील काही सावकारांचा परवाना शहरापुरता मर्यादित आहे. काहींचा तालुक्यातील विशिष्ट गावापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे बाजूच्या गावातील एखाद्या शेतकऱ्याने कार्यक्षेत्र ठरलेल्या सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास ते अपात्र ठरत आहे.या कर्जमाफी योजनेसाठी शेगाव येथील दोन परवानाधारक सावकाराकडून सहा शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज पात्र ठरले. त्यामुळे या शेतकऱ्यांचे व्याजासह एक लाख २१ हजार ४०१ रुपये आता माफ होणार आहे. (शहर प्रतिनिधी)अट रद्द कराशेतकरी हा जवळ असलेल्या बाजारपेठेत आपला शेतमाल विकत असतो. तेथूनच तो कर्जाची उचल करीत असतो. भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील शेतकरी वरोरा बाजारपेठेत माल विकत असतात. वरोरा येथील सावकारांकडून कर्ज घेत असतात. त्यामुळे शासनाने कर्जमाफीसाठी परवानाधारक सावकाराच्या कार्यक्षेत्राची अट रद्द करुन सातबाराधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे. .