शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या भेटीविनाच कार्यकर्ते परतले...!

By admin | Updated: November 23, 2015 01:02 IST

चंद्रपूर जिल्ह्याचे भूमीेपुत्र असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली येथे वन अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेच्या ...

लोकप्रतिनिधीही भेटीविनाच परत : शेकडो कार्यकर्त्यांचा हिरमोड, नागरिकांचीही उसळली होती गर्दीखडसंगी : चंद्रपूर जिल्ह्याचे भूमीेपुत्र असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली येथे वन अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमासाठी आगमन झाले होते. याच दरम्यान चिमूर तालुक्यातील तुकूम (मासळ) येथील एका खासगी कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती चिमूर क्रांती नगरीतील कार्यकर्ताना होताच शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तुकूम या गावात दुपारी ३ वाजतापासून गर्दी केली. मात्र मुख्यमंत्री आता येतील, मग येतील, अशी वाट पाहून अंधार झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीविनाच माघारी परतावे लागले. यामुळे अनेक उत्साही कार्यकर्तांचा हिरमोड झाला.भाजपा-सेना युतीच्या काळात अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर विदर्भातील मुख्यमंत्री मिळाला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मूळ गाव चंद्रपूर जिल्ह्यातील मूल असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही अभिमानाची बाब आहे. आपल्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर नागरिकांची उत्सुकताही तेवढ्याच प्रमाणात शिगेला पोहोचली. त्यामुळे मुख्यमंत्री चिमूर तालुक्यातील तुकूम (मासळ) या तिनशे लोकसंख्येच्या गावात एका खाजगी कार्यक्रमात येणार असल्याने तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, जिल्हापरिषद, नगर परिषद सदस्य तथा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हारतुरे घेऊन शनिवारी दुपारी ३ वाजतापासून उपस्थित झाले.मुख्यमंत्र्याच्या हस्ते एका इमारतीचे उद्घाटन होणार असल्याने त्याठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह पोलीस विभागाचे मोठे अधिकारी चोख बंदोबस्तासह परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमात उशिर झाल्याने व त्यांच्या जंगल भ्रमंतीमुळे चिमूर तालुक्यात यायला त्यांना रात्रीचे ९.३० वाजले. मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी दुपारी ३ वाजतापासून आलेल्या कार्यकर्त्यांना रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षेत राहावे लागले. मात्र जास्तच उशीर होत असल्याने कार्यकर्त्यांना आपल्या मुख्यमंत्र्याचा भेटीविनाच माघारी परतावे लागल्याने अनेकांचा हिरमोड झाला. (वार्ताहर)स्वागताचे हार विसावले पार्र्किंगच्या फलकावरलाडक्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आणलेले हार हातात घेऊन बराच वेळ प्रतीक्षा केली. मात्र मुख्यमंत्री यायला उशीर झाल्याने हातात घेऊन असलेले स्वागताचे हार पार्किंगच्या पफलकावर लटकवून ठेवले आणि ते हार अखेरपर्यंत स्वागतविनाच राहले. तर कार्यकर्त्यांना आणलेले फटाकेही न फोडता तसेच परत न्यावे लागले.पिण्याच्या पाण्याचाही अभावमुख्यमंत्री एका खासगी कार्यक्रमासाठी येत असले तरी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी झाली. मात्र आलेल्या कार्यकर्त्यांना साधे पाणी पिण्याचीही व्यवस्था एका मोठ्या प्रतिष्ठानाच्या मालकाने केली नाही. कार्यकर्ते तर सोडाच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस शिपायांनाही पाणी मिळत नव्हते.