शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांची भविष्य निर्वाह निधी हडपली

By admin | Updated: September 4, 2014 23:42 IST

कर्नाटका एम्टा कोल माईन्स या कोळसा खाणीच्या महाप्रबंधकांनी गेल्या पाच वर्षात १८१ कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये कायद्याप्रमाणे पैशाचा भरणा केला नाही. कंपणीने आजपर्यंत एक कोटी २० लाख

भद्रावती : कर्नाटका एम्टा कोल माईन्स या कोळसा खाणीच्या महाप्रबंधकांनी गेल्या पाच वर्षात १८१ कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये कायद्याप्रमाणे पैशाचा भरणा केला नाही. कंपणीने आजपर्यंत एक कोटी २० लाख रुपयांची रक्कम हडपल्याचा आरोप राष्ट्रीय कोळसा कामगार संघर्ष संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोद मोहोड यांनी पत्रकार परिषदेत केला. अफरातफरीची तक्रार एम्टा कोलमाईन्स येथील कामगार रामदास मत्ते, विशाल दुधे आणि राष्ट्रीय कोयला कामगार संघर्ष संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोद मोहोड यांनी महाप्रबंधक रामबहादूर सिंग, वरिष्ठ कार्मिक प्रबंधक पुष्पकुमार जैस्वाल यांच्या विरोधात भद्रावती पोलिसांत दाखल केली आहे. या खाणीतील ३९४ कामगारांपैकी १८१ कामगार कोळसा खाण भविष्य निर्वाह निधीचे (जीपीएफ) सदस्य आहे. कोळसा खाण भविष्य निधी अधिनियम १९८४ नुसार कर्मचाऱ्यास प्राप्त होणाऱ्या मूळ वेतन, महागाई भत्ता, ओव्हर टाईम वेतन तसेच हॉलीेडेच्या एकूण वेतनावर १२ टक्के अंशदान कपात करण्याची तरतूद आहे आणि तेवढेच अंशदान व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करायचे असतो. ैत्याच प्रमाणे कोळसा खाण पेन्शन योजना १९९८ प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन व महागाई भत्त्यावर दोन टक्के अंशदान कपात करून ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या पेंशन खात्यात जमा करायची असते. माहिती अधिकाराच्या माध्यमातून क्षेत्रीय आयुक्त कोळसा खान भविष्य निधी कार्यालय नागपूर यांचे कडून यासंदर्भात माहिती मागविल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचे मोहोड यांनी सांगितले. नियमाला बगल देवून कपंनीने कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनातून १२ टक्के कपात करण्याऐवजी केवळ मूळ वेतनावर १२ टक्के रक्कम कपात केली आहे. तेवढीच रक्कम जमा स्वत: कामगाराच्या भविष्य निधीत जमा केली आहे आणि भविष्य निर्वाह निधीत सुद्धा दोन टक्के रक्कम कपात करीत आहे. या माध्यमातून कंपनीने १८१ कामगारांचे एक कोटी २० लाख रुपये हडप केले आहे. केंद्र शासनाच्या खान विभागाला द्यावयाचा तीन टक्के व्यवस्थापकीय कराची चोरी करण्यात आली आहे. कंंपणीने कामागरासोबतच केंद्र सरकारची सुद्धा फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल न केल्यास १५ दिवसांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील दिशा ठरवू असेही मोहोड यांनी सांगितले. पत्रपरिषदेला इंटकचे धनंजय गुंडावार, संजय दुबे, विशाल दुधे, हिदनेश वानखेडे, उपेन्द्र यादव, रामा मत्ते, सुधीर बोढाले, अमरदीप म्हशाखेत्री, संजय आसुटकर, बंडू जोगी, गुणवंत दैवळकर, नितीन चालखुरे, महेश पेटकर आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)