शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीच्या संकल्प पूर्तीमध्ये वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचा सिंहाचा वाटा

By admin | Updated: August 29, 2016 01:20 IST

२ कोटी वृक्ष लागवडीचा जो संकल्प आपण केला होता, त्या संकल्पपुर्तीसाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जे परिश्रम घेतले;

सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : सेवानिवृत्त व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारचंद्रपूर : २ कोटी वृक्ष लागवडीचा जो संकल्प आपण केला होता, त्या संकल्पपुर्तीसाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जे परिश्रम घेतले; त्यामुळेच हा संकल्प आम्ही पूर्ण करू शकलो. या प्रक्रियेमध्ये वनकर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.रविवारी महसुल भवन चंद्रपूर येथे चंद्रपूर तालुका वनखाते सहकारी पतसंस्था मर्या. यांच्यावतीने सभेचे औचित्य साधुन आयोजित सेवानिवृत्तांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर भाजपा नेते राजीव गोलीवार, चंद्रपूर तालुका वनखाते सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष संतोष अतकारे, उपाध्क्ष दिलीप आत्राम, सचिव योगेश धकाते व पतसंस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य लक्षात घेत सेवानिवृत्तांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत, ही भावना जपत चंद्रपूर तालुका वनखाते कर्मचारी सहकार पतसंस्थेने आपल्या सेवाकाळात वनविभागाची सेवा करणाऱ्या सेवानिवृत्तांचा जो सत्कार आयोजित केला, तो खरोखरच अभिनंदनीय आहे. अमेरीका जरी प्रगत देश असला तरीही आपल्या देशात समाधान जास्त आहे; कारण आपल्या देशात जिव्हाळा, आपुलकी ही भावना आहे, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन राजेश पिंपळकर यांनी केले. कार्यक्रमाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची व परिवार सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)वनकर्मचाऱ्यांना मोटार सायकली देण्याचा विचारवनविभाग कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले आहे. वाहन भत्त्यात वाढ करणे, २८० वाहने खरेदी करणे असे अनेक निर्णय घेतले असून येणाऱ्या काळात वनकर्मचाऱ्यांना मोटार सायकली देण्याचा सुध्दा शासनाचा विचार आहे. वनविभागाची कार्यालये आय.एस.ओ. प्रमाणित करण्याचा शासनाचा मानस आहे. पूर्वी दुर्लक्षित समजला जाणारा वनविभाग आता वरदान ठरला आहे. रोजगार देण्यामध्ये वनविभाग इतर विभागांच्याही पुढे जाईल, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.