शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सात वीज उपकेंद्रांची कामे सुरू

By admin | Updated: June 25, 2017 00:34 IST

मागील काही वर्षापासून वरोरा व भद्रावती तालुक्यात वीज ग्राहकांना कमी उपकेंद्र असल्यामुळे विद्युत पुरवठ्यात अडचणी निर्माण होत होत्या.

वरोरा व भद्रावती तालुका : बाळू धानोरकर यांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील काही वर्षापासून वरोरा व भद्रावती तालुक्यात वीज ग्राहकांना कमी उपकेंद्र असल्यामुळे विद्युत पुरवठ्यात अडचणी निर्माण होत होत्या. या अडचणींवर मात करण्याकरिता वरोरा व भद्रावती तालुक्यात सात नवीन उपकेंद्रांना मंजुरी आणण्याकरिता पुढाकार घेतला. त्यात सातही उपकेंद्रांची कामे प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसांत हे उपकेंद्र कार्यान्वित होणार आहेत, अशी माहिती आ. बाळू धानोरकर यांनी दिली.वीज वितरण कंपनीच्या वरोरा येथील कार्यालय परिसरात आ. धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, वरोरा उपकार्यकारी अभियंता विनोदकुमार भोयर, भद्रावती उपकार्यकारी अभियंता सचिन बदखल, वरोरा न.प. गटनेता गजानन मेश्राम, वरोरा बाजार समिती सभापती विशाल बदखल, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे, उपसभापती राजू चिकटे, नगरसेवक राजू महाजन, बाजार समिती संचालक दत्ता बोरेकर, प्रमोद मगरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर, भद्रावती न.प. उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, युवराज मोरे, भद्रावती शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर ताजने आदी उपस्थित होते. भद्रावती व वरोरा तालुक्यात पिरली (धानोली), एमआयडीसी, भद्रावती, मुधोली, कोंढा, नागरी, वणी रोड, वरोरा आदी सात ठिकाणी वीज उपकेंद्र होणार असून त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. येत्या काही दिवसात ते कार्यान्वित होणार आहेत. तसेच वरोरा तालुक्यातील पांझुर्णी व सावरी येथे ३३ केव्ही उपकेंद्र जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आले आहे. मार्च-२०१७ अखेरीस वरोरा तालुक्यात ६२२ व भद्रावती तालुक्यात १७९ अशा ८०१ कृषिपंप जोडणी करण्यात आलेली आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वरोरा व भद्रावती तालुक्यातील वीज ग्राहकांनी आपल्या समस्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. त्यावर आ. धानोरकर यांनी वीज ग्राहकांच्या समस्या किती दिवसात सोडविणार, याबाबत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. वीज ग्राहकांच्या समस्या विहीत मुदतीत सोडविल्या गेल्या नाहीत. तर ग्राहकांना आपल्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.