शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

उमा नदीवरील पुलाचे काम युद्धपातळीवर

By admin | Updated: January 6, 2016 01:23 IST

मूल तालुक्यातील भेजगाव जवळील उमा नदीवरील पूल वर्षभरापूर्वी दबला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडल्याने जवळपास १५ गावाचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटला.

पालकमंत्र्यांचा पुढाकार : १० कोटींचा निधी भेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव जवळील उमा नदीवरील पूल वर्षभरापूर्वी दबला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडल्याने जवळपास १५ गावाचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटला. याची दखल घेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूल बांधकामासाठी १० कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे या पुलाचे काम डिसेंबर महिन्यापासून युद्धपाळतीवर सुरु झाले आहे.पूल बदल्याने या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे परिसरातील प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मूल-चिचाळा-भेजगाव हा रस्ता दर्जेदार करून त्यास प्रजिमा- २३ असे संबोधन्यात येणार आहे. या रस्त्यावर चाळीस वर्षापूर्वी आर्च काजवे प्रकारचा पूल बांधण्यात आला. त्यावरून वाहतूक सुरु होती. मात्र पुलाची उंची फारच कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये जवळपास तीन महिने वाहतूक बंद राहत होती. त्यामुळे नागरिकांची मागणी लक्षात घेऊन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी उमा नदीवर पूल बांधकाम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करुन भुपृष्ठ मंत्रालयाकडून १० कोटी रुपये मंजुर केले. या रक्कमेतून मोठ्या पूलाचे बांधकाम होणार आहे. प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यापासून कामाला सुरुवात झाली आहे. काम युद्धपातळीवर सुरु असल्याने पूलाची समस्या लवकरच मार्गी लागणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे. (वार्ताहर)