शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न करावे

By admin | Updated: March 10, 2016 01:20 IST

आजघडीला महिला सर्वच क्षेत्रात सरशी घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणातही पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल सुरू आहे.

मेघा भाले : विसापुरात महिलाशक्तीचा जागर बल्लारपूर : आजघडीला महिला सर्वच क्षेत्रात सरशी घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणातही पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल सुरू आहे. त्यांच्या इच्छाशक्तीला प्रयत्नांचे बळ प्राप्त होत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील वावर यशस्वी आलेख उंचावणारा आहे. आता मागे वळून पाहण्याचे दिवस संपले असून आगेकुच करीत महिलांनी आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन अ‍ॅड. मेघा भाले यांनी केले. बुधवारी विसापूर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला शक्तीचा जागर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने पंढरीनाथ देवस्थान, मंगल कार्यालयात महिला दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककला, कपलरेस, निंबु चमचा, संगीत खुर्ची आदी स्पर्धा पार पडल्या. अध्यक्षस्थानी विसापूरच्या सरपंच रिता जिलटे होत्या. याप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. मेघा भाले, सुरेखा कुलटे, शशीकला खिरटकर, राधाबाई नांदे, मंजुळा कन्नाके, अफसाना शेख, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, शशीकला जीवने, सुरेखा इटनकर, निता वनकर, सुरेखा कोडापे, सरिता झाडे, उज्वला कोडापे, मीना जुमनाके यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला मार्लापन करून मानवंदना देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन व आभार शारदा डाहुले यांनी केले. यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी गावातील महिलांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)