शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बिल्टच्या आंदोलनात महिलांचाही सहभाग

By admin | Updated: May 5, 2016 01:24 IST

बल्लारपूर शहराची आर्थिक वाहिनी असलेल्या बल्लारपूर पेपर मिल उद्योगाला वनविभाग मंत्रालयाने बांबू व लाकडांचा पुरवठा करण्यासंदर्भात उदासीनतेचे धोरण अंगीकारले आहे.

आंदोलनाचा चौथा दिवस : आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारबल्लारपूर : बल्लारपूर शहराची आर्थिक वाहिनी असलेल्या बल्लारपूर पेपर मिल उद्योगाला वनविभाग मंत्रालयाने बांबू व लाकडांचा पुरवठा करण्यासंदर्भात उदासीनतेचे धोरण अंगीकारले आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे कार्यरत कामगाराच्या उपजिवीकेचा प्रश्न गंभीर होणार आहे. मिलचे उत्पादनही ठप्प होण्याच्या मार्गावर आले आहे. राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी येत्या १० मे रोजी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार माजी खासदार नरेश पुगलिया यांनी व्यक्त केला. बुधवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी महिलांचाही सहभाग मिळाला असून आठ महिला उपोषणाला बसल्या आहेत.बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने रविवारपासून स्थानिक नगरपालिका चौकात खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी बल्लारपूर पेपर मिलचे कर्मचारी जयंत नंदूरकर, श्रीकृष्ण कौरासे, विजय बहादूरसिंग, चंदू भूक, धीरज सिंग यांचे उपोषण लिंबूपाणी पाजून माजी खासदार व कामगार नेते नरेश पुगलिया, गजानन गावंडे, नगरसेवक प्रवीण पडवेकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, वसंत मांढरे, देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, रजनी मुलचंदानी, नासिरखान यांनी सोडविले.दरम्यान, बुधवारला या आंदोलनात महिलांनीही उडी घेतली. छाया मडावी, माजी नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी, माजी नगरसेवक एलिजाबेथ, नगरसेवक करुणा रेब्बावार यांनी अ‍ॅड. मेघा भाले, माजी नगराध्यक्ष छबूताई मेश्राम, माजी नगरसेविका शोभादेवी महंतो, रोजिदा ताजुद्दीन, अर्चना बुटले, वर्षा दानव, उमादेवी मिश्रा यांना पुष्पहार अर्पण करुन उपोषणाला बसविण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना नरेश पुगलिया म्हणाले, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध आहे. सन २०१४ पूर्वी कच्चा माल उपलब्ध करुन देण्यासाठी शासन स्तरावरुन १०-१५ वर्षाचा करार केला जात होता. मात्र वनमंत्री जिल्ह्याचे असूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी पेपर मिल उद्योग संकटात आला आहे. निविदा प्रक्रिया दोनदा रद्द करण्यात आली. यामुळे ९० टक्के कच्चा माल परराज्यातून आणावा लागत आहे. उद्योगाला बळ देण्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा उपलब्ध करुन देण्याचे धोरण असताना वन विभागाचे मंत्रालय याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यावर शासनाने तोडगा न काढल्यास आंदोलनाची धार तीव्र करण्यात येणार आहे. ७ मेपर्यंतचे हे साखळी उपोषण १४ मेपर्यंत करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)