शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप

By admin | Updated: July 12, 2015 01:12 IST

तालुक्यातील मालडोंगरी ग्रामपंचायतीला एका महिलेने अतिक्रमणाच्या जागेवर टॅक्स लावण्यासाठी सरपंचांना चिरीमिरी देऊनही काम न झाल्याने चक्क ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले.

सरपंचांनी तोडले : टॅक्स लावण्यासाठी महिलेची पायपीटब्रह्मपुरी : तालुक्यातील मालडोंगरी ग्रामपंचायतीला एका महिलेने अतिक्रमणाच्या जागेवर टॅक्स लावण्यासाठी सरपंचांना चिरीमिरी देऊनही काम न झाल्याने चक्क ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले. सरपंचांनी ते कुलूप तोडल्याने ग्रामसेवक व कर्मचारी यांनी सुटकेचा नि: श्वास सोडला असला तरी हा सर्व प्रकार गावकऱ्यांसाठी विचार करायला भाग पाडणारा ठरला आहे.आज शनिवारी सकाळी गावातील एका महिलेने १० वाजताच्या सुमारास घरून कुलूप आणून सरपंचांच्या विरोधात मोठमोठ्याने ओरडून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. संपूर्ण दिवसभर ग्रामपंचायत बंद होती. ग्रामसेवक व कर्मचारी दिवसभर ताटकळत बाहेर होते. सदर महिलेने अतिक्रमाणाच्या जागेवर टॅक्स सुरू करण्याविषयी सरपंचाला चिरीमिरी दिली होती. परंतु अजूनही टॅक्स लावला न गेल्याने ती संतप्त झाली व रागाच्या भरात तिने ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले. सरपंचांनी टॅक्स लावण्यासाठी चिरीमिरी घेतल्याचा मोठमोठ्याने आरोप करीत होती व हे प्रत्यक्षदर्शी गावकरी ऐकत होते. सरपंच गावात नसल्याने ते सायंकाळी आले असता त्यांनी हा प्रकार पाहून स्वत:च कुलूप तोडले. गावकरी अचंबित होऊन हा सर्व प्रकार पाहत होते.सदर घटनेची रितसर तक्रार कोणीही केली नसल्यामुळे महिलेची भूमिका योग्य असल्याचे बोलले जात आहे. ग्रामपंचायत सदस्य सचिन ठेंगरी यांनी या घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिली. हा प्रकार काय वळण घेते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)