शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

माकडाला मारल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST

चंद्रपूर : येथील बंगाली कॅम्प परिसरामध्ये आंब्याच्या झाडावर आंबे खात असलेल्या माकडाला मारल्या प्रकरणी तक्रारीनंतर वनविभागाने महिलेवर गुन्हा दाखल ...

चंद्रपूर : येथील बंगाली कॅम्प परिसरामध्ये आंब्याच्या झाडावर आंबे खात असलेल्या माकडाला मारल्या प्रकरणी तक्रारीनंतर वनविभागाने महिलेवर गुन्हा दाखल केला आहे असे वनविभागांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव--????? आहे.

येथील बंगाली कॅम्प श्यामनगर परिसरात असलेल्या भगतसिंग चौकामध्ये या महिलेचे घर असून त्यांच्याकडे आंब्याच्या झाडासह इतरही झाडेझुडपे आहे. दरम्यान, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगली प्राणी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत. असेच एक माकड बंगाली कॅम्प परिसरात आपल्या पिल्लांसह आले होते. ते आंब्याच्या झाडावर आंबे खात असताना महिलेने काठीच्या सहाय्याने हाकलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका माकडाला जास्त मार लागल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती येथील प्यार फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र रापेल्ली यांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत पहाणी केली. त्यानंतर वनविभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून चंद्रपूर वनविभागाने त्या महिलेवर वनविभागाच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, माकडाची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच महिला फरार झाली असून तिचा शोध वनविभागाचे कर्मचारी घेत आहे.