शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

साक्षी देऊलवार जिल्ह्यात प्रथम

By admin | Updated: May 29, 2016 00:57 IST

सीबीएसई अभ्यासक्रमाचा दहावीचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला.

पालकांमध्ये आनंदोत्सव : दहावी सीबीएसईचा निकाल १०० टक्केचंद्रपूर : सीबीएसई अभ्यासक्रमाचा दहावीचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व शाळा या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून जिल्ह्याचा निकाल १०० टक्के लागला आहे. श्री महर्षी विद्यामंदिर, चंद्रपूरची साक्षी देऊलवार ही १० सीजीपीए रँक घेऊन प्रथम जिल्ह्यात प्रथम आली आहे.चंद्रपूर शहरात सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित १२ विद्यालये आहेत. यासोबत बल्लारपूर, दुर्गापूर, घुग्घूस, ब्रह्मपुरी, राजुरासह अनेक शहरात सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित विद्यालये आहेत. या सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. चंद्रपुरात नारायणा विद्यालय, महर्षी विद्यालय, माऊंट कारमेल स्कूल, कारमेल अकाडमी, चांदा पब्लिक स्कूल, महर्षी विद्यामंदिर, माऊंट हायस्कूल, केंद्रीय विद्यालय, दुर्गापूर, माऊंट फोर्ट ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर व बल्लारपूर स्कूल या शाळांनीही मागील वर्षीप्रमाणे शंभर टक्के निकाल दिला. यातील बारावी अभ्यासक्रमाच्या विद्यालयाचा बारावीतही निकाल १०० टक्के लागला होता. श्री महर्षी विद्यामंदिरची साक्षी देऊलवार हिने १० सीजीपीए रँक घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. नारायणा विद्यालयाची जागृती मोघे ही (१० सीजीपीए) द्वितीय आली आहे तर नारायणा विद्यालयाचाच संदेश गीरडकर हा (१० सीजीपीए) तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.शैक्षणिक भवितव्यातील दहावीचा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. सर्वच विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्री महर्षी विद्यामंदिरातील २३ विद्यार्थ्यांना ए१, तसेच २३ विद्यार्थ्यांना ए२ ग्रेड प्राप्त झाली आहे. याच शाळेची जान्हवी त्रिपूरवार, सिध्देश टोंगे यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. चांदा पब्लिक स्कूलचा समीर मुद्दमवार, सेंट मेरी हायस्कूल दुर्गापूरचा रोहित गेडाम, संघपाल मेश्राम, दृष्टी सुंकटवार, रोहिणी सातपुते, श्रेया कामद यांनी प्रावीण्य मिळविले आहे. सेंट माईकल इंग्लिश स्कूल, चंद्रपूरचा समीर धोटे, हर्षदा गोटेफोडे, कशीश शेख व पल्लवी दुधलकर यांनीही प्रावीण्य प्राप्त केले आहे. इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक स्कूल राजुराची सबा पठाण (१० सीजीपीए), प्रज्ञेस किन्नाके व कार्तिक तुम्मावार यांनी घवघवीत यश मिळविले आहे. यासोबत ब्रह्मपुरी, चिमूर, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, राजुरा येथील सीबीएससी अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)