शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:28 IST

सिंदेवाही : सध्या वन्यप्राणी जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये येत असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्राण्यांचा ...

सिंदेवाही : सध्या वन्यप्राणी जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये येत असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बाखर्डी : औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या गडचांदूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

अल्पउत्पादनाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

नागभीड : परिसरात मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्यावर अनेक संकट कोसळले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाने विविध योजना राबवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढला

घुग्घुस : पडोली तसेच अन्य पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने येथील कर्मचाऱ्यांना कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बेरोजगारांना हवा आर्थिक आधार

वरोरा : तालुक्यात बेरोजगारांची संख्या अधिक असून, त्यांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी सामाजिक संस्थेने बेरोजगार मेळावा आयोजित करून प्रशिक्षण दिले होते. दरम्यान, खाणीमध्ये काही कामगार कामाला जातात. मात्र त्यांच्या पाल्यांना काम नसल्याने नोकरीच्या शोधात इतरत्र भटकत आहे. शासनाने विविध योजना राबवून हाताला काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

भद्रावती : मागील काही वर्षांमध्ये वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यातच अनेकजण आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावत असल्याने शहरातील काही भागांमध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

लांब अंतरावरील बसफेऱ्यांची मागणी

जिवती : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती येथून लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याची मागणी केली जात आहे. जिवती येथून यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अहेरी, चिमूर, ब्रह्मपुरी, नांदेड, लातूर, केरीमेरी, आदिलाबादमार्गे कोरपना अशा बसेस सोडण्याची मागणी केली जात आहे.

नळयोजनांना तांत्रिक अडचणीचे ग्रहण

ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळयोजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वस्तू ठरत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याने ग्रामीण नागरिकांनी पाण्यासाठी भटकावे लागत आहे. बंद असलेल्या नळ योजना प्रशासनाने सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

शौचालयाअभावी नागरिकांची गैरसोय

कोरपना : तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांत शौचालयाची व्यवस्था नसल्याने कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासकीय कार्यालयात नेहमीच अस्वच्छता दिसून येते. याचा परिणाम नागरिक व कर्मचाऱ्यांवरही होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन शासकीय कार्यालयात शौचालयाची निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुर्गम भागात रस्ता बांधण्याची मागणी

जिवती : तालुक्यातील आंध्र-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या काही गावांत पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गावात रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सिंचनापासून शेतकरी आजही वंचित

घुग्घुस : शेजारी असलेल्या अनेक गावांमध्ये तलाव आहे. मात्र ते दुर्लक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना या तलावांचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. त्यामुळे या तलावांची दुरुस्ती करून तलावाचे पाणी सिंचनासाठी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.