शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यादेखत वन्यप्राणी करतात शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटात भरडला जातो. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी हातात येणारे पीक वन्यप्राणी भरदिवसा डोळ्यांदेखत  उदध्वस्त करीत असतात. परंतु वनविभागाने यावर अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना केली  नाही. त्यामुळे दरवर्षी वन्यप्राण्यांकडून शेतीचे अतोनात नुकसान केले जाते. वन्यप्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. 

ठळक मुद्देवनविभागाची तोकडी मदत शेतकऱ्यांना तारणार कशी ?

  लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वन्यप्राण्यांमुळे दरवर्षी शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान केले जाते. शेतकरी शेतात दिवसरात्र मेहनत करून पिकांना जिवापाड जपत असतात. परंतु वनविभाग वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी असफल ठरला असून पिकांमध्ये वन्यप्राणी भरदिवसा धिंगाणा घालत असल्याने शेतकºयांच्या हातात येणारे पीक डोळ्यांदेखत प्राणी उदध्वस्त करीत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून वनविभागाने वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटात भरडला जातो. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी हातात येणारे पीक वन्यप्राणी भरदिवसा डोळ्यांदेखत  उदध्वस्त करीत असतात. परंतु वनविभागाने यावर अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना केली  नाही. त्यामुळे दरवर्षी वन्यप्राण्यांकडून शेतीचे अतोनात नुकसान केले जाते. वन्यप्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. सध्या पीक फळधारणेवर आले आहे. सोयाबीन पीक कापणीला आले तर कपाशीला बोंडे लागली आहे. पीक शेतकºयांच्या हातात आले असले तरी अजूनही बहुतांश पीक शेतात आहे. मात्र वन्यप्राणी भरदिवसा शेतात धिंगाणा घालून पीक उदध्वस्त करीत आहे. वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी प्रभाकर जुनघरी, बंडूजी बोभाटे,भास्कर जुनघरी,विकास पिंपळकर,श्रीधर जुनघरी,प्रमोद लांडे, सुनील देळवाकर, मंगेश जुनघरी, राजेश्वर कुंचेवार,चेतन बोभाटे,निखिल लांडे,तुषार लोहे, केतन बोभाटे,भूषण जुनघरी व शेतकºयांनी केली आहे. 

नुकसान भरपाई नको, बंदोबस्त कराशेतकरी उसनवारी व कर्ज काढून शेतीवर मोठया प्रमाणात दरवर्षी खर्च करीत असतात. मात्र वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकºयांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. नुकसान भरपाई म्हणून शासन शेतकºयांना नाममात्र भरपाई देऊन मोकळे होतात. नुकसान लाखाचे आणि मदत हजारात अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्हाला मदत नको वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, असा केविलवाणा सूर शेतकरीवर्गात उमटायला लागला आहे

वेकोलिचे ढिगारे झाले झुडुपी जंगलराजुरा तालुक्यातील बहुतांश भाग झुडपी जंगलाने व्यापला आहे. सोबतच गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी, वरोडा परिसरात मोठया प्रमाणात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा उत्खननासाठी वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे शेतीच्या परिसरात टाकल्यामुळे या मातीच्या महाकाय ढिगाºयावर झुडपी जंगल तयार झाल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर असतो. भरदिवसा वन्यप्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करीत असल्याने हातात येणारे पीक नष्ट होत आहे. 

 

टॅग्स :agricultureशेती